‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मधून घराघरात पोहोचलेली आयेशा म्हणजेच अभिनेत्री विदिशा म्हसकर नेहमी चर्चेत असते. कधी कामामुळे तर कधी सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतीच तिनं एक संतप्त होऊन पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या माध्यमातून तिनं आपली फसवणूक झाल्याचं सांगत इतर कलाकार मंडळींना एक विनंती केली होती.

अभिनेत्री विदिशा म्हसकर काही फोटो शेअर केले होते. ज्यामधील एका फोटोमध्ये तिनं लिहिलं होतं, “नमस्कार मी विदिशा म्हसकर. कलाकार म्हणून आम्ही पैसे घेऊन सार्वजनिक कार्यक्रम करतो. सुजित सरकाले या माणसाने दोन महिन्यांपासून माझं मानधन थकवलं आहे. माझा विश्वास मिळवण्यासाठी आधीच्या दोन कार्यक्रमाचे पैसे त्याने वेळेत दिले होते. पण २३ मार्च २०२४ रोजी आम्ही एक कार्यक्रम केला त्याचं मानधन अजून दिलेलं नाही. मॅडम काय आपल्याच आहेत, असं म्हणून त्याने फसवणूक केली आहे. नंतर मला कळलं की, याने अनेकांची फसवणूक केली आहे. दोन महिने याने अनेक खोटी कारणं दिली. खोटो चेकचे फोटो पाठवले, खोटे गुगल पेचे फोटो पाठवले. तरी माझ्या इतर कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांना (Event Organisers) सावधान करणं माझं कर्तव्य वाटतं. याच्याकडून कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आला तरी मानधनाची खात्री घेतल्या शिवाय तो कार्यक्रम करू नका. सावधान राहा. धन्यवाद.” तसेच बाकी फोटोमध्ये चेक, गुगल पे आणि संबंधित व्यक्तीचा प्रोफाइल होता.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर चिमुकल्या लेकीसह निघाली परदेशवारीला, पोस्ट करत म्हणाली, “ताशीच्या…”

विदिशाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “ही पोस्ट करण्यामागचं कारण एकच…फसवणूक… खरं सांगून पैसे दिले नसते तरी चाललं असतं… पण फसवणूक मी कधी कोणाची केली नाही आणि कोणी करत असेल तर मी त्याला सोडणार नाही आणि दुसऱ्यांची ही करू देणार नाही. @sujit_sarkale @celebrity_manager_rudr या माणसाकडे खोटे आधारकार्ड पण आहेत. माझ्या कलाकार मित्रांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी सावधान व्हावे हेच सांगेन. धन्यवाद.” पण काही वेळात विदिशाने ही पोस्ट डिलीट केली. विदिशाने बऱ्याच वर्षांपूर्वी मालिकेच्या निर्मात्याने पैसे थकवल्यामुळे आवाज उठवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विदिशा कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेपूर्वी विदिशाने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतही तिनं खलनायिकेची भूमिका निभावली होती. सावनी असं तिच्या भूमिकेचं नाव होतं, जे चांगलंच गाजलं होतं. तसंच तिनं ‘रंग माझा वेगळा’नंतर ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत काम केलं.