Nandish Sandhu Kavita Banerjee Engagement : ‘उतरन’ फेम अभिनेता नंदिश संधूने साखरपुडा केला आहे. रश्मी देसाईपासून घटस्फोट घेतल्यावर सिंगल असलेल्या नंदिशने नवीन सुरुवात केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली.

अभिनेत्री रश्मी देसाईचा एक्स पती, अभिनेता नंदिश संधू पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ४३ वर्षांचा नंदिश संधू पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याने सोशल मीडियावर होणाऱ्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. नंदिशने अभिनेत्री कविता बॅनर्जीशी साखरपुडा केला आहे. दोघेही फोटोमध्ये साखरपुड्याची अंगठी फ्लाँट करत आहेत.

नंदिशने सोशल मीडियावर घोषणा केली की त्याने या वर्षी सप्टेंबरमध्ये अभिनेत्री कविता बॅनर्जीशी साखरपुडा केला आहे. “हाय, पार्टनर. तयार?” असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केले आहेत. तर कविताने एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आहेत. त्यात कविता तिची एंगेजमेंट रिंग दाखवतेय. कॅप्शनमध्ये तिने खास ५/०९/२५ ही तारीख लिहिली आहे. याचाच अर्थ या दोघांनी ५ सप्टेंबरला साखरपुडा केला.

पाहा पोस्ट

नंदिशने साखरपुड्याची पोस्ट केल्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत. आरती सिंह, ऐश्वर्या खरे, टीना दत्ता, आकांक्षा पुरी, कुणाल सैन, वाहबीज दोराबजी, अपेक्षा पोरवाल, खिलजी नझीम, क्रिष्णा कौल, अपर्णा मिश्रासह अनेक कलाकारांनी नंदिश व कविता यांचं अभिनंदन केलं आहे. मराठमोळ्या अमृता खानविलकरनेही या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे. चाहत्यांनी नंदिशच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

nandish sandhu kavita banerjee engagement
नंदिश संधूच्या पोस्टवरील कमेंट्स (सौजन्य- इन्स्टाग्राम)

नंदिश संधूचा घटस्फोट

Nadish Sandhu Rashmi Desai Divore: नंदिश संधूने अभिनेत्री रश्मी देसाईशी २०११ मध्ये लग्न केलं होतं. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंदिशने ‘उतरन’, ‘वो फिर सुबह होगी’, ‘बेइंतेहा’ आणि ‘ग्रहण’ या मालिका केल्या आहेत. तसेच नंदीश ‘सुपर 30’, आणि ‘जुबली’ मध्येही काम केलंय.

कोण आहे कविता बॅनर्जी?

Who is Kavita Banerjee : नंदिशची होणारी पत्नी कविता बॅनर्जी अभिनेत्री आहे. तिने तेरी मेरी एक जिंदरी, एक व्हिलन रिटर्न्स, दिव्य प्रेम – अ स्टोरी ऑफ लव्ह अँड मिस्ट्रीमध्ये काम केलंय.