Nandish Sandhu Kavita Banerjee Engagement : ‘उतरन’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचा एक्स पती नंदिश संधूने गर्लफ्रेंडशी साखरपुडा केला आहे. ४३ वर्षांचा नंदिश पुन्हा प्रेमात पडला असून त्याने नातं अधिकृत केलं आहे. घटस्फोटानंतर तब्बल ९ वर्षांनी नंदिशने नवीन सुरुवात केली आहे. नंदिशने अभिनेत्री कविता बॅनर्जीशी साखरपुडा केला आहे.
नंदिशने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यावर सेलिब्रिटी त्याला शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे नंदिश व रश्मी देसाई (Rashmi Desai Nandish Sandhu Divorce) यांचं नातं का मोडलं होतं, याबद्दल चर्चा होत आहेत. ‘उतरन’ मालिकेत एकत्र काम करताना नंदिश व रश्मी जवळ आले होते. काही वर्षे डेट केल्यावर त्यांनी लग्न केलं, पण नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाचं कारण काय होतं? दोघेही घटस्फोटाबद्दल काय म्हणाले होते? ते जाणून घेऊयात.
Rashmi Desai Nandish Sandhu Divorce Reason: रश्मी देसाई व नंदिश संधु यांचं लग्न चार वर्षांत मोडलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मीने दावा केला होता की त्यांचं लग्न मोडण्याचं कारण नंदिशची मुलींबरोबरची मैत्री होतं. दुसरीकडे नंदिश रश्मीच्या अतीसंवेदनशील स्वभावाला वैतागला होता.
नंदिश संधू घटस्फोटाबद्दल काय म्हणाला होता?
Nandish Sandhu on Divorce with Rashmi Desai: नंदिशने एका मुलाखतीत म्हणालेला, “मी आधी रश्मीला विनंती केली होती की या नात्याला तिने एक संधी द्यावी. पण तिने दुसऱ्यांदा घटस्फोट मागितल्यावर मी काहीच न बोलता नातं संपवलं. कारण मी माझ्या बाजूने हे नातं वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता.”

रश्मी देसाई घटस्फोटाबद्दल म्हणालेली…
Rashmi Desai on Divorce with Nandish Sandhu : दुसरीकडे रश्मीनेही घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “जर नंदिशने आमचं नातं वाचवण्याचा प्रयत्न केला असता, तर आमच्यात कधीच काहीच चुकीचं घडलं नसतं. त्याची मुलींशी मैत्री होती, याची मला काहीच अडचण नव्हती. मी कधीच त्याच्यावर संशय घेतला नाही,” असं रश्मी म्हणाली होती.
दरम्यान, घटस्फोटाआधी रश्मी देसाई व नंदिश संधू यांनी नातं टिकावं यासाठी डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए’मध्ये भाग घेतला होता. पण तरीही त्यांच्या नात्यात काहीच सुधारणा झाली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, रश्मीचा गर्भपात झाला, त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. शेवटी दोघेही २०१६ मध्ये कायदेशीररित्या विभक्त झाले.
रश्मी व नंदिश यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर १२ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर काही दिवसांनीच दोघांच्या नात्यात अडचणी येऊ लागल्या. एक वेळ अशी आली की रश्मी नंदिशचं घर सोडून दुसरीकडे राहायला गेली. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.