आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर तिचे करोडो चाहते आहेत. तर ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर आता लवकरच तिचा मराठमोळा अंदाज समोर येणार आहे.

‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये ती सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर या कार्यक्रमामध्ये ती लावणीही सादर करणार आहे. कार्यक्रमातील तिचे काही प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत. आता नुकत्याच आउट झालेल्या प्रोमोमध्ये ती विचारलेल्या प्रश्नांची चक्क मराठीत उत्तरं देताना दिसली. झी चित्र गौरवच्या मंचावर रश्मिकाने निलेश साबळेशी मराठीत संवाद साधला.

आणखी वाचा : Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”

या पुरस्कार सोहळ्याचा एक प्रोमो नुकताच व्हायरल झाला. यात डॉ.निलेश साबळेने रश्मिकाला म्हटलं, “आता आपण थोडं मराठीत गप्पा मारुया.” तेव्हा रश्मिका लगेच “हो. मी प्रयत्न करते” असं म्हणाली. तिने होकार देताच निलेशने तिला विचारलं, “तुम्हाला कोल्हापुरला यायला आवडेल का?” यावर हसत हसत रश्मिकाने कोल्हापुरी अंदाजात उत्तर दिलं. ती म्हणाली, “चालतंय की.”

हेही वाचा : ‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिचं हे कोल्हापुरी शैलीतील उत्तर ऐकून सर्वजण आवाक् झाले आहेत. या श्रीवल्लीच्या या उत्तराने कोल्हापूरकर विशेष खुश झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून तिचा हा रांगडा अंदाज आवडल्याचं सर्वजण सांगत आहेत.