Ratris Khel Chale Fame Actress : टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. विविध मालिकांमुळे या कलाकारांना घराघरांत पोहोचण्याची संधी मिळते. त्यात एखादी मालिका लोकप्रिय ठरली तर, संबंधित कलाकाराचा एक वेगळाच फॅनबेस तयार होतो. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सुद्धा सर्वत्र तुफान गाजली.
‘रात्रीस खेळ चाले’ मधील अण्णा नाईक, शेवंता, छाया, सुशल्या, सरिता, दत्ता या पात्रांनी प्रेक्षकांचं मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ही मालिका वाहिनीवर रात्री उशिराच्या स्लॉटला म्हणजेच १०:३० वाजता प्रसारित केली जायची. मात्र, तरीही या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याच सिरियलमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने नुकताच संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे पाहुयात…
एप्रिल महिन्यापासून सोशल मीडियावर सर्वत्र संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. हे गाणं सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे बॉलीवूडसह अनेक मराठी कलाकार सुद्धा या गाण्यावर थिरकले आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील अभिनेत्रीने देखील या गाण्यावर डान्स करत अगदी हुबेहूब हूकस्टेप करत ट्रेंड फॉलो केला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे अश्विनी मुकादम.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये अश्विनी मुकादमने ‘सरिता’ ही भूमिका साकारली होती. सरिता ही अण्णा नाईक-माईंची सून आणि दत्तारामची बायको असते. मालिका सुरू असताना सरिता हे पात्र सुद्धा सर्वत्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं. हे पात्र गाजल्यावर अश्विनीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये कामं केली. सध्या ती ‘माझ्या बायकोचा रोबोट’ या नाटकात काम करत आहे.

‘माझ्या बायकोचा रोबोट’ या नाटकातील सहअभिनेत्रींसह अश्विनीने ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा तिच्या या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अश्विनी मुकादमच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेसह ‘मन धागा धागा जोडते नवा’ यामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. याशिवाय ‘आत्मपॅम्फ्लेट’ आणि पिकासो या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.