Bigg Boss Marathi New Promo: ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये पहिल्या आठवड्यातच खूप भांडणं झाली. अनेकांचे वाद झाले, स्पर्धकांनी नियम मोडले व त्यांना शिक्षाही झाली. या घरात निक्की तांबोळी हिने वर्षा उसगांवकरांचा अपमान केला होता. त्याशिवाय इतर अनेकांशी तिची भांडणं झाली. निक्कीचा आता रितेश देशमुखने चांगलाच समाचार घेतला आहे.

घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या ‘चिन टपाक डम डम’चा अर्थ काय? तो ऑडिओ कुठून आला? जाणून घ्या

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार आहे.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश देशमुख निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,”वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

रितेश पुढे म्हणाला,”‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही.. त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार”.