‘बिग बॉस १६’ मध्ये या आठवड्यातील ‘विकेंड का वार’मध्ये मराठमोळा रितेश देशमुख बायको जिनिलियासह पोहोचला होता. रितेश-जिनिलिया त्यांच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. यावेळी त्यांनी होस्ट सलमान खानबरोबर आणि घरातील स्पर्धकांबरोबर गप्पा मारल्या.

“तू बॉडी बनवण्यासाठी स्टिरॉईड्स घेतोस” टीना दत्ताने आरोप करताच संतापला शालीन, म्हणाला, “तू मूर्ख…”

यावेळी सलमानने रितेशला प्रश्न विचारला की तुला घरातील कोणता सदस्य सर्वात मजबूत वाटतोय. त्यावर रितेशने मराठमोळ्या शिव ठाकरेचं नाव घेतलं. तसेच तो म्हणाला, घरातील सर्वात स्ट्राँग सदस्य शिव ठाकरे आहे. त्याला काय करायचंय हे त्याला माहीत आहे. तो खूप चांगल्या पद्धतीने त्याचे मुद्दे सर्वांसमोर मांडतो, असं रितेश शिवचं कौतुक करत म्हणाला.

Bigg Boss 16: स्पर्धकांनी अंकित गुप्ताला दाखवला बाहेरचा रस्ता; कारण कळताच ‘बिग बॉस’सह सलमान खानवर संतापले चाहते

रितेश आणि जिनिलिया दोघेही बिग बॉसच्या घरात गेले होते. यावेळी त्यांनी घरातील सदस्यांशी गप्पा मारल्या, तसेच काही प्रश्न विचारले. स्वतःशिवाय घरातील कोणता सदस्य हा शो जिंकू शकतो, असं तुम्हाला वाटतं, असा प्रश्न रितेशने सर्वांना विचारला. त्यावर अर्चना आणि सौंदर्याने शिवचं नाव घेतलं. तसेच साजिद खानने शिव ठाकरेचं हा शो जिंकणार असल्याचं म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला वाटतंय की तो हा शो जिंकणारच आहे. पण त्याला मनापासून ही ट्रॉफी हवीये, मी आजपर्यंत आयुष्यात अशी व्यक्ती पाहिली नाहीये, पहिल्या दिवसापासून आज जवळपास तीन महिने होत आलेत, पण तो रोज रात्री झोपण्यापूर्वी बिग बॉसच्या साईनला नमस्कार करतो. त्याच्या या वेडेपणाला सलाम,” असं साजिद खान शिव ठाकरेबद्दल बोलताना म्हणाला.