बिग बॉस मराठीच्या घरात वाद, रुसवे-फुगवे, प्रेमप्रकरण या गोष्टी कायमच चर्चेचा विषय ठरतात. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून डॉ. रोहित शिंदे हा बाहेर पडला. यानंतर त्याने रुचिरा जाधवला घरात पाठिंबा न देण्याबद्दल भाष्य केले.

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची चर्चा आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या स्पर्धेत टॉपमध्ये असल्याचे पाहायला मिळतो. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून डॉ. रोहित शिंदे हा बाहेर पडला. यानंतर त्याने रुचिराने केलेल्या अनेक आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिले. यावेळी त्याने रुचिराला पाठिंबा देण्याबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत त्याने याबद्दल भाष्य केले आहे.
आणखी वाचा : “तिच्याजागी मी असतो तर…” रुचिराने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रोहित शिंदे स्पष्टच बोलला

“ज्या आठवड्यात आमचं भांडण झालं त्याच आठवड्यात रुचिरा घराबाहेर पडली. त्या आठवड्यात आमच्या खूप वाद झाले होते. ते छोटे छोटे वाद होते, पण ते तुम्ही पाहिले असतील. जर तिला पाठिंबा द्यायचा म्हणाल तर मी तिच्याबरोबर खेळायलाही तयार झालो होतो. त्याच आठवड्यात एका टास्कमध्ये मी आणि रुचिरानेच अक्षयला पकडून ठेवलं होतं. आम्ही टीमशी प्रामाणिक होतो. आम्ही आमच्या मतावर ठाम होतो.

त्यांच्याबरोबर खेळू नकोस, असं रुचिराचं मत नव्हतं. आपण आपल्या पद्धतीने खेळू असे तिला वाटत होते. त्यांना त्यांचा खेळ खेळू दे, आपण आपला खेळ खेळू असे आम्ही ठरवले होते. त्यानुसार आम्ही वागतही होतो. पण त्याच आठवड्यात तिला बाहेर पडावे लागले. कुठे तरी एखादी गोष्ट एकमेकांना खटकते. तिलाही काही गोष्टी खटकायच्या. अक्षय आणि अपूर्वाचे माझ्याबरोबर फार चांगले नाते होते. त्यांचे ते खरे प्रेम आहे.

रुची जेव्हा एलिमिनेट झाली त्या आठवड्यात मी अनेक गोष्टींवर बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे तिची बाजू घेतलीच नाही असं नाही. रुचिरा घराबाहेर जाणार नाही, असे सर्वांनाच वाटत होते. पण तिचे बाहेर जाणं हे सर्वांसाठी धक्कादायक होते. घरातल्या सर्व लोकांना फार धक्का बसला होता”, असेही रोहित म्हणाला.

आणखी वाचा : “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

दरम्यान बिग बॉसच्या यंदाच्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे हे रिअल लाईफ कपल सहभागी झाले होते. मात्र बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. त्यांच्यात वाद देखील झाला. अशातच रुचिरा नॉमिनेट झाल्याने त्यांच्यामधला वाद आणखी चिघळला. कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर तिने रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या.