Rubina Dilaik Reveals How Abhinav Shukla Respond To Her Proposal: अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपे आहे. बिग बॉस १४ मधून ते घराघरात पोहोचले. या रिॲलिटी शोमधून या जोडीला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. रुबिनाने या शोची ट्रॉफीदेखील जिंकली.
अभिनेत्री काय म्हणाली?
आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पती पत्नी और पंगा- जोडियों का रिअॅलिटी चेक’ या कार्यक्रमात हे कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी होताना दिसत आहेत.
या शोमध्ये प्रेक्षकांना काय पाहता येईल, याबद्दल निर्मात्यांनी खुलासा केला केला. त्याबरोबरच रुबिना अभिनवबरोबरच्या नात्याबाबत काय म्हणाली, याबद्दलही निर्मात्यांनी खुलासा केला.
निर्मात्यांनी रुबिनाने जेव्हा अभिनवला प्रपोज केले होते, त्यावेळी अभिनवचा प्रतिसाद काय होता, यावर वक्तव्य केले आहे. रुबिनाने तिच्या प्रपोजलचा किस्सा सांगितला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारीला रुबिनाने अभिनवसमोर तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते. त्यावर अभिनवने अनेक महिन्यानंतर तिला उत्तर दिले होते.
रुबिना म्हणाली, “नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मी अभिनवकडे पाहिले आणि त्याला सांगितले की, मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे. त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, थँक्यू. त्याचा प्रतिसाद इतकाच होता. अनेक महिने मी हा विचार करत होते, की तो कदाचित नकार देईल. एके दिवशी बहुतेक नऊ महिन्यांनंतर तो मला म्हणाला की मलासुद्धा. हे त्याचे माझ्या प्रपोजलवर उत्तर होते.”
पुढे ते असेही म्हणाली, “आम्ही असेच आहोत. थोडे वेगळे आहोत. आमच्याबद्दल काही गोष्टी लोकांना समजणार नाहीत. पण, आम्ही जसे आहोत, तसे खूप खरे आहोत.”
ती असेही म्हणाली की, आमच्या दोघांची मते खूप वेगळी असतात. तो पूर्णत: तार्किक आणि वैज्ञानिकदृष्ट्या विचार करतो आणि मी खूप भावनिक होऊन विचार करते. पण, त्यामुळे आम्हीच एकत्र आहोत.
पती, पत्नी और पंगा हा शो अभिनेत्री सोनाली बेंद्रे व मुन्नावर फारुकी होस्ट करणार आहेत. रुबिना आणि अभिनव यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लॉकडाऊनमध्ये त्यांच्यात मोठे वाद झाल्याचेदेखील त्यांनी सांगितले होते. बिग बॉस १४ मध्ये सहभागी होऊन त्यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना दोन मुली आहेत.
दरम्यान, आता या शोमध्ये नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.