टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस १४ ची विजेती रुबीना दिलैक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होताना दिसतात. आताही रुबीनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात तिच्या चेहऱ्याची वाईट अवस्था झालेली दिसत आहे. रुबीनाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांना तिला पाहून राखी सावंतची आठवण झाली आहे. तर काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

रुबीना दिलैकने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने तब्येत बिघडल्याचं सांगितलं आहे. रुबीनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “ताप, घशाचं इन्फेक्शन यामुळे माझे ओठ आणि चेहऱ्यावर सूज आली आहे. मी सध्या एखाद्या बदकाप्रमाणे दिसत आहे. मी याला त्रासले आहे आणि खूप वैतागलेही आहे. माझा स्वतःचा चेहरा पाहून मलाच हसूही येत आहे.”

आणखी वाचा- राखी-आदिल खानच्या वादात एक्स गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य; म्हणाली, “या सगळ्यात माझं…”

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये रुबीनाचा चेहरा सुजलेला दिसत आहे. कोणतीही फिलर सर्जरी न करता तिचे ओठ बदकासारखे दिसत असल्याचं तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर तिचे डोळे आणि चेहऱ्यावरही सूज आलेली दिसत आहे. तब्येत ठीक नसल्याने रुबीनाचा चेहरा सुजला असला तरीही नेटकऱ्यांनी मात्र कमेंटमध्ये राखी सावंतचा उल्लेख केला आहे.

आणखी वाचा-Video: पत्नीबरोबर रोमँटिक डान्स केल्याने संजय दत्त ट्रोल; नेटकरी म्हणाले, “बाबा जास्त नशेत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
rubina dilaik instagram

रुबीनाचे हे फोटो पाहून काहींनी चिंता व्यक्त केली आहे तर काही युजर्सनी तिची खिल्ली उडवली आहे. एका युजरने लिहिलं, “असं वाटतंय मॅडमनी खराब झालेला मेकअप वापरला आहे.” दुसऱ्या युजरने, “असं काय खाल्लं की तुझ्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली?” असं प्रश्न विचारला आहे. तर आणखी एका युजरने, “तू तर आता राखी सावंतसारखी दिसत आहेस.” अशी कमेंटही केली आहे.