‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा टीव्हीवरील लोकप्रिय मराठी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर जगभरातील मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शिवाली परब, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, गौरव मोरे, चेतना भट्ट, पृथ्वीक प्रताप आणि इतर कलाकार आपल्या जबरदस्त विनोदी टायमिंगने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळेच जेव्हा ओंकार भोजनेने हा शो सोडला तेव्हा त्याची खूप चर्चा झाली, किंबहुना आजही होते. आता चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी भार्गवी चिरमुलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ओंकारने शो का सोडला याबाबत खुलासा केला आहे.

“म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा” म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “तुमच्या घराण्यात…”

सचिन मोटे म्हणाले, “ओंकार भोजनेने शो सोडला, त्यावेळी तो खूप दबावात होता. कारण त्याच्याकडे खूप कामं होती. तो म्हणाला होता, ‘माझ्याकडे सलग खूप कामं आली आहेत, त्यामुळे मी हास्यजत्रेला वेळ देऊ शकणार नाही. तसेच माझ्या तब्येतीचीही खूप कारणं आहेत.'”

दरम्यान, करोना काळातील लॉकडाउनमध्ये हे विनोदी शो खूप लोकप्रिय झाले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कपिल शर्मा शो’, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमांना त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली. “हास्यजत्रामध्ये काय आहे, हे करोनामुळे लोकांपर्यंत पोहोचलं. समीर चौघुले व विशाखा सुभेदार यांना लता मंगेशकर यांनी फोन करून तुमचे स्किट खूप आवडत असल्याचं म्हटलं होतं,” अशी आठवणही सचिन मोटे यांनी सांगितली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin mote sachin goswami reveals why onkar bhojane left maharashtrachi hasyajatra hrc
First published on: 02-11-2023 at 13:02 IST