अभिनेत्री सई लोकूर तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. ‘प्लॅटफॉर्म’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘पारंबी’ यांसारख्या चित्रपटात झळकलेल्या सईने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नशीब आजमावलं आहे. तिने कपिल शर्माच्या ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटात काम केलं होतं. पण तिला ‘बिग बॉस मराठी’मुळे खूप लोकप्रिय मिळाली. अशी ही लोकप्रिय सई सध्या मातृत्व एन्जॉय करत आहे.

सई लोकूरने १७ डिसेंबर २०२३ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर १७ जानेवारीला २०२४ला तिने मुलीची पहिली झलक चाहत्यांना दाखवून नाव जाहीर केलं. सईने मुलीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. येत्या १७ फेब्रुवारीला सईची लाडकी ताशी दोन महिन्यांची होईल. अशातच सईने काल चाहत्यांशी संवाद साधला.

हेही वाचा – दुसऱ्या बाळाचा प्लॅन आहे?” चाहत्याच्या प्रश्नावर सई लोकूर उत्तर देत म्हणाली, “खूप…”

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी सईवर प्रश्नांचा भडीमार केला. तरीही सईने बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी चाहत्यांनी ताशीच्या नावाच्या अर्थापासून ते ताशीचं आवडतं गाणं कोणतं? असे अनेक प्रश्न विचारले. तेव्हा सईने ताशीच्या आवडत्या गाण्याचा खुलासा केला. सलील कुलकर्णी यांचं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ हे गाणं ताशीचं आवडतं गाणं आहे, असं अभिनेत्रीने सांगितलं.

हेही वाचा – Video: “गणपती बाप्पा मोरया…”, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या सेटवरील पहिला व्हिडिओ सचिन पिळगांवकरांनी केला शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सईने २० नोव्हेंबर २०२० रोजी तीर्थदीप रॉयबरोबर लग्न केलं. मराठी व बंगाली अशा दोन पद्धतीत सई व तीर्थदीपचं लग्न झालं. त्यानंतर ३ वर्षांनी दोघं आई-बाबा झाले.