scorecardresearch

“आम्ही सगळेच तिला हास्यजत्रेत…” समीर चौगुलेंची विशाखा सुभेदारसाठी खास पोस्ट

विशाखा सुभेदारने वर्षभराच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.

Samir Choughule Vishakha Subhedar
समीर चौगुले-विशाखा सुभेदार

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. एक उत्तम कॉमेडियन म्हणून तिला ओळखले जाते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली. विशाखा सुभेदारचा आज वाढदिवस. या निमित्ताने अभिनेता समीर चौगुलेने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

समीर चौगुले हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी विशाखा सुभेदारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी तिच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “बुलेट ट्रेननंतर हास्यजत्रा…” मालिकेत कमबॅक करणाऱ्या विशाखा सुभेदारने ट्रोल करणाऱ्याला खडसावले

समीर चौगुलेंची पोस्ट

“वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा विशाखा सुभेदार …….विशू किती उत्तम आणि प्रगल्भ अभिनेत्री आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाहीय..विनोद आणि गंभीर अश्या सर्व गल्यांमध्ये मनसोक्त मुशाफिरी करणारी विशू शेर, गझल, कविता या प्रांतात शिरली की काहीशी हळवी होते. हास्यजत्रेत तिच्या बरोबर घातलेला धुमाकूळ हा निव्वळ आणि निखळ आनंद देणारा होता…

एक सह कलाकार आणि मैत्रीण म्हणून आम्ही सगळेच तिला मिस करतो…आणि ती वेगळ्या वाहिनीवरील कार्यक्रमात उत्तम काम करतेय याचा आम्हाला आनंद ही आहे…”kurrrrr” नावाचं एक उत्तम मनोरंजन करणार नाटक घेऊन ती आता लवकरच अमेरिका दौऱ्या वर जातेय..विशू तुला खूप खूप शुभेच्छा …तुझ्या सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होवोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना..खूप प्रेम…..”, असे समीर चौगुलेंनी म्हटले आहे.

दरम्यान विशाखा सुभेदारने वर्षभराच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ या मालिकेतून तिने पुनपदार्पण केले. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात, विशाखा ‘ये रे ये रे पैसा’ (२०१८) आणि ‘६६ सदाशिव’ (२०१९) या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. तसेच तिचे ‘कुर्रर्र’ हे नाटकही सुरु आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या