Kartiki Gaikwad Baby Shower: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. नुकताच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. अशातच कार्तिकीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा अनसीन व्हिडीओ समोर आला आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गायिका कार्तिकी गायकवाडने २०२०मध्ये रोनित पिसे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. पुण्यात पारंपरिक पद्धतीने कार्तिकी-रोनितचा लग्नसोहळा झाला होता. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी-रोनितच्या घरी पाळणार हलणार आहे. सध्या कार्तिकीला सातवा महिना आहे. मे महिन्यात ती एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.

हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत, साकारणार महत्त्वाची भूमिका

नुकताच कार्तिकीने डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्तिकी व रोनितचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या डोहाळे जेवणात कुटुंबातील सदस्य कार्तिकीसाठी खास डान्स देखील करताना दिसत आहेत. यावेळी मुलगा की मुलगी हे ओळखायचा खेळ घेतला. यासाठी दोघांसमोर दोन लाल बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यापैकी कार्तिकी व रोनितने एक लाल बॉक्स उचलला, ज्याच्याखाली झोपाळ्यावर एक चिमुकल्या मुलाचं बाहुलं होतं. आता यावरून कार्तिकी एका गोंडस चिमुकल्याला जन्म देणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: “आपण नव्याने सुरुवात करुया…”, सागर मागतो मुफ्ताची माफी, पाहा व्हिडीओ

कार्तिकी गायकवाडचा नवरा कोण आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिकीचा नवरा रोनित हा पुण्याचा असून मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. याशिवाय शेअर मार्केटिंग संबंधित रोनितचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.