‘स्टार प्रवाह’वरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कीर्ती-शुभमची जोडी तर हीट झाली होती. त्याबरोबरच इतर पात्रांना देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता यामालिकेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील जीजीअक्का पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री अदिती देशपांडे यांनी जीजीअक्काची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती. आता अदिती देशपांडे नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

cannes film festival indian film
यंदा भारतीयांनी गाजवला कान फिल्म फेस्टिवल; चित्रपटसृष्टीत याला इतके महत्त्व का? याची सुरुवात कशी झाली?
Dalljiet Kaur confirms separation with nikhil patel
अवघ्या १० महिन्यांत मोडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं दुसरं लग्न; पतीच्या अफेअरबद्दल स्क्रीनशॉट्स केले शेअर
kiran mane shared Janhvi Kapoor video
“बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना कुत्सित…”, जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंचं वक्तव्य
maidaan OTT Release
अजय देवगणचा ‘मैदान’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यावर एकाच महिन्यात आला OTT वर; पण आहे ‘हा’ मोठा ट्विस्ट
star pravah new marathi serial
Video : ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, जबरदस्त प्रोमो आला समोर
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
sakshi Tanwar
सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: “आपण नव्याने सुरुवात करुया…”, सागर मागतो मुफ्ताची माफी, पाहा व्हिडीओ

‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी’मध्ये अदिती देशपांडे झळकणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या ‘लग्नाची बेडी’ मालिकेत अदिती या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, ‘लग्नाची बेडी’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सायली देवधर, रेवती लेले, संकेत पाठक, मिलिंद अधिकारी असे अनेक कलाकार आहेत. आता या कलाकारांच्या मांदियाळीत अदित देशपांडे नव्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Video: सुपरस्टार राम चरणच्या लेकीची ११ महिन्यांनंतर दिसली पहिली झलक, व्हिडीओ व्हायरल

याआधी अदिती देशपांडे यांनी अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांचे बरेच मराठी चित्रपट सुपरहिट झाले आहेत. ‘जोगवा’, ‘रेगे’, ‘पक पक पकाक’ ,’नॉट ओन्ली मिसेस राऊत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका सााकारल्या आहेत.