Savlyachi Janu Savali Serial New Promo : ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मानसी कुलकर्णीची एन्ट्री झाली आहे. ती यामध्ये शिवानी कारखानीस ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेत शिवानी सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सध्या सारंग व सावली यांचं नातं बहरत असल्याचं पाहायला मिळत होत. परंतु, आता शिवानीच्या येण्यानं मात्र दोघांच्या नात्यात दुरावा येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीनं नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये सारंग शिवानीला त्याच्या व सावलीच्या लग्नाबद्दल सांगताना दिसतो. तो म्हणातो, “खरं तरं आमचं लग्न जरा घाई-गडबडीत झालं होतं; पण आम्हाला त्याचा पश्चाताप नाहीये”. त्यावर शिवानी “दॅट्स सो स्वीट ऑफ यू; पण तुझ्या केसांत काहीतरी आहे का?” असं म्हणत त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिथे सावली येते.

शिवानी-सारंगला एकत्र पाहून सावलीला होणार गैरसमज?

प्रोमोमध्ये शिवानी व सारंगला एकमेकांच्या जवळ आल्याचे सावली बघते आणि तेवढ्यात शिवानी स्वत:ला सावरते. असं पाहायला मिळतं. सारंग व शिवानीला इतक्या जवळ पाहून सावलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्याचे दिसतात. त्यामुळे आता शिवानी व सारंगला एकत्र पाहून सावलीच्या मनात गैरसमज निर्माण होईल का आणि शिवानीच्या प्रेमाच्या जाळ्यात सारंग अडकणार का हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

शिवानीला गेली सलग १० वर्षं सर्वोत्कृष्ट उद्योजिकेचा पुरस्कार मिळत आलेला असतो; परंतु यावेळी तो सारंगला मिळाल्याने तिच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण होतो, असं मालिकेत पाहायला मिळालं. ऐश्वर्याकडून तिला सावली व सारंगच्या लग्नाबद्दल कळल्यानतंर ती त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सारंग व सावली वेळीच शिवानीचा हा डाव ओळखू शकतील का किंवा सारंग शिवानीच्या जाळ्यात खरंच अडकणार का हे पाहणं रंजक ठरेल.