मराठी सिनेसृष्टीत मालवणी भाषेचा बोलबाला निर्माण करणारे अभिनेते म्हणून दिगंबर नाईक यांना ओळखले जाते. कोकणचे सुपूत्र अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माणा केली. नुकतंच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंग, आर्थिक चढ-उताराबद्दल भाष्य केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिगंबर नाईक हे सध्या मालिका, नाटक आणि चित्रपटात काम करताना दिसत आहेत. नुकतंच त्यांनी ‘ई-टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीत करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले वाईट दिवस आणि सिनेसृष्टीतील काम याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “मी ‘पावनखिंड’साठी दाढी, मिशी वाढवली होती, पण दिग्पाल दादाने…” विराजस कुलकर्णीचा गौप्यस्फोट

“तुम्ही पन्नाशी ओलांडली आहे, तरीही तुम्ही सिनेसृष्टीत इतके सक्रीय कसे असतात, त्याबरोबर तुम्ही तुमचे काम कशाप्रकारे मॅनेज करता?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला माझ्या कामाबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. मला कधीही, काहीही असलं तरीही काम करायला आवडते. मी कायमच कामाबद्दल दिलेली माझी वचन पाळतो.

“मी आता ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे, त्याठिकाणी पोहोचण्यासाठी मी सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत केली आहे. त्यामुळे मी माझे काम कायमच प्रामाणिकपणे करतो. त्याद्वारे लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो.”

आणखी वाचा : “हे फोटो टाकणं…” पत्नीने अंघोळ करताना शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर सिद्धार्थ चांदेकरची कमेंट

“मी सिनेसृष्टीत पदार्पण केले त्यावेळेचे दिवस फारच खडतर होते. त्यावेळी माझ्याकडे पैसे नसायचे. मी कधीकधी फक्त ब्रेड खाऊन दिवस काढले आहेत. मी सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक समस्यांचा सामना केला आहे. मी चित्रपट, नाटक मिळवण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे”, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अनेकदा मी ब्रेड पाण्यात बुडवून खायचो आणि झोपायचो. पण त्यावेळी मला सिनेसृष्टीत काम करायचे होते. तेव्हा ऑडिशन्स द्यावा लागायच्या. माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही मी ऑडिशन आणि शूटींगसाठी कसा जायचो, हे केवळ मला माहिती आहे. पण आज मला असं वाटतं की संघर्षाशिवाय तुमच्या जीवनात मजा नाही. संघर्ष हा तुम्हाला जगायला शिकवतो आणि जगण्याचे धडेही देतो”, असे दिगंबर नाईक म्हणाले.