गेल्या काही दिवसांमध्ये झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. तर अनेक जुन्या मालिकां प्रेक्षकांचा निरोपही घेताना दिसत आहेत. काही मालिका या टीआरपीच्या घसरणीमुळे बंद करण्यात आल्या आहेत तर काही मालिकांचे कथानक पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे बघायला मिळाले. आता लवकरच झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ मालिका ऑफ एअर होणार आहे.
हेही वाचा- Premachi Goshta: धमाल, मस्ती अन् बरंच काही….; पाहा सागर-मुक्ताच्या लग्नाचा BTS व्हिडीओ
‘३६ गुणी जोडी’ मालिका २३ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली. आत्तापर्यंत या मालिकेने २९४ भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेत आयुष्य संजीव आणि अनुष्का सरकटे यांची प्रमुख भूमिका होती. मध्यंतरी या ’ मालिकेच्या प्रसाणाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. ही मालिका सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित करण्यात येत होती झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या नव्या मालिकेमुळे ‘३६ गुणी जोडी’ मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता.
‘३६ गुणी जोडी’ या मालिकेच्या वेळेत बदल करून रात्री ती ११ वाजता प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर आठवडाभर ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात आली. पण ४ डिसेंबरपासून ‘३६ गुणी जोडी’ मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. मालिकेच्या वेळेत सतत बदल करण्यात आल्यामुळे प्रेक्षक चांगलेच भडकल्याचे बघायला मिळाले होते. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत झी मराठीला ट्रोल केले होते.
हेही वाचा-
दुसरीकडे झी मराठीवर लवकरच ‘ड्रामा ज्युनिअर्स’नावाचा रिअॅलिटी शो सुरु होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तसेच‘ड्रामा ज्युनिअर्स’साठी लवकरच ऑडिशनही सुरु होणार आहे.