Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील एका सदस्याचे प्रेक्षक आणि रितेश देशमुखकडून वारंवार कौतुक होताना पाहायला मिळत आहे. हा सदस्य म्हणजे अभिजीत सावंत होय. अभिजीत सावंतने पहिल्या दिवसापासून आपल्या वेगळेपणाने, योग्य वेळी योग्य भूमिका मांडल्याने, स्वत:ची बाजू भक्कमपणे मांडल्याने तो सर्वांचा आवडता झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिजीत सावंतने एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानबाबत सांगितलेली आठवण सध्या चर्चांचा भाग झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाला अभिजीत सावंत?

अभिजीत सावंतने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. यावेळी त्याची गाण्याची सुरुवात कशी झाली, इंडियन आयडलचा प्रवास कसा होता, त्याचे कुटुंब आणि करिअर अशा अनेक गोष्टींबाबत गप्पा मारल्या आहेत. यावेळी बोलताना त्याने म्हटले, “आम्ही युकेमध्ये कॉन्स्टर्टसाठी गेलो होतो. त्या कॉन्सर्टमध्ये त्याची पूर्ण टीम, त्याचे बॉडीगार्ड आले होते. जिथे इव्हेंट होता, तिथे वेगवेगळे बूथ होते. एका बूथवर फोटो, त्यानंतर परफॉर्मन्स, दुसरा जिथे कोणाला भेटायचे असेल तर आणि तिसरं चेजिंग रुम होते. मी असं सगळं करुन चेजिंग रुमकडे चाललो होतो. शाहरुख खान तिथून चालला होता. तो थांबला. माझा हात हातात घेतला आणि माझे कौतुक केले. खूप चांगले करत आहेस, असं तो म्हणाला.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi : “तुमचा टेलर बारामतीचा दिसतोय”, धनंजयचं जॅकेट पाहून रितेशने घेतली फिरकी; म्हणाला, “बारामतीची स्टाईल…”

पुढे बोलताना त्याने म्हटले, “एकदा शाहरुखने त्याच्या शोमध्ये गायला देखील बोलवलं होतं आणि स्वत: स्टेजवरुन सर्वांना सांगितले की, माझ्या घरचे सर्व ज्याला मोठ्या प्रमाणात पसंत करतात, अशा अभिजीत सावंतचे स्वागत करुयात.” अशी आठवण अभिजीत सावंतने या मुलाखतीदरम्यान सांगितली.

अभिजीत सावंत म्हणतो “इंडियन आयडलनंतर एकाचवेळी दोन वेगळी आयुष्य जगायला मिळाली. एक जिथे स्टारडम होतं, प्रसिद्धी होती, मोठमोठ्या लोक ओळखत होते, कौतुक करत होते आणि दुसरं माझं पूर्वीचं साधं आयुष्य होतं.”

हेही वाचा: Video : शाहरुख-काजोलच्या सुपरहिट गाण्यावर अभिजीत-निक्कीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “ती कशीही असो पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अभिजीत सावंतची पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याबरोबरच आजच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणत्या सदस्याची शाळा घेणार आणि कोणत्या सदस्याला शाबासकीची थाप देणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.