अभिनेता शालिन भानोत ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वामुळे सध्या चर्चेत आहे. उत्तम खेळाच्या जोरावर शालिनने ‘बिग बॉस हिंदी’च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. ‘बिग बॉस’च्या घरात शालिनचं पहिलं लग्न व पत्नीबाबतही अनेकदा चर्चा झालेली पाहायला मिळाली. शालिनची पहिली पत्नी दलजीत कौर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे.

शालिन व दलजितला जेयडन हा मुलगा आहे. दलजीत कौर निखिल पटेलसह विवाहबंधनात अडकून त्यानंतर केनियाला शिफ्ट होणार आहे. नुकतंच दलजीतने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने दुसरं लग्न व त्याबाबत मुलाच्या प्रतिसादाबाबतही भाष्य केलं. दलजीत म्हणाली, “जेयडन जेव्हा पहिल्यांदी निखिलला भेटला, तेव्हा त्याने स्वत:हूनच निखिलला पप्पा म्हणून हाक मारली. याआधीही मी अनेक जणांना भेटली आहे. परंतु, जेयडनला निखिलबाबत ज्या भवाना होत्या इतर कोणाबाबतही वाटल्या नाहीत”.

हेही वाचा>> Video: राखी सावंत प्रकरणावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया, म्हणाली “तिच्याबरोबर…”

दुसऱ्या लग्नाबाबत जेयडन खूश असल्याचंही दलजीतने सांगितलं. “केनियाला शिफ्ट होण्यासाठी जेयडन उत्सुक आहे. शाळेत सोडायला व आणायला कोणीतरी येणार आहे, यामुळे तो आनंदी आहे. जेव्हा मी म्हणजे त्याची आई कामानिमित्त बाहेर असेल, तेव्हा घरी त्याची काळजी घेणारं कोणीतरी असेल, हेही त्याला माहीत आहे. याशिवाय शालिन त्याचे पहिले वडील आहेत, याची जाणीवही त्याला आहे”, असंही दलजीत म्हणाली.

हेही वाचा>> Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजिद खानचं अफेअर? नाव समोर येताच म्हणाली, “मी त्यांच्याकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शालिन व दलजीतने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. परंतु, २०१५ मध्ये ते घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. घटस्फोटानंतर आता आठ वर्षांनी दलजीत निखिल पटेलसह विवाहबंधनात अडकणार आहे. तर ‘बिग बॉस’Video: राखी सावंत प्रकरणावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया, म्हणाली “तिच्याबरोबर…”च्या घरात शालिनचं नाव टीना दत्ताबरोबर जोडलं गेलं होतं. परंतु, नंतर त्यांच्यात खटके उडाल्याचं पाहयला मिळालं.