‘स्टार प्रवाह’वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या पर्वाला प्रेक्षकांचं चांगला प्रतिसाद मिळत आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेच्या नव्या कथानकासह अनेक नवीन पात्रही भेटीला आली आहेत. मात्र ज्या पात्राला गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना पाहायचं होतं त्या शालिनी शिर्के-पाटीलची लवकरच मालिकेत दमदार एन्ट्री होणार आहे.

जयदीप-गौरीबरोबर शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर आता जवळपास २५ वर्षांनंतर ती पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे. इतक्या वर्षांच्या काळात शालिनी कुठे होती? काय करत होती? याची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडतीलच, मात्र शालिनीच्या पुन्हा येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार हे मात्र नक्की.

हेही वाचा – Video: उर्वशी रौतेलाचा आईच्या वाढदिवसाच्या पार्टीत जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “करंट लागलाय का?”

शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर पुन्हा एकदा नव्याने शालिनी साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा येतेय. २५ वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या राहणीमानात बरेच बदल झाले आहेत. इतके दिवस आपण शालिनीला साडीमध्ये आणि अस्खलित कोल्हापुरी भाषा बोलताना पाहिलं आहे. मात्र आता शालिनीचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळेल. यानिमित्ताने अभिनेत्री माधवी म्हणाली, “एकाच पात्रामध्ये दोन वेगळे लूक मला साकारायला मिळत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत परत कधी येणार याची विचारणा होत होती. मला प्रेक्षकांना सांगायला अतिशय आनंद होतोय की शालिनी पुन्हा येतेय.”

हेही वाचा – Video: फुलांचा वर्षाव, पंचपक्वान्न अन् डान्स…; प्रथमेश परबने शेअर केला केळवणाचा व्हिडीओ, म्हणाला, “जेव्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ वर्षांनंतर शालिनीचा स्वभाव बदलला आहे की अजूनही तिच्या मनात सुडाची आग धगधगतेय? आणि ती पुढे काय-काय नवे डाव रचतेय? नित्या-अधिराज समोर आल्यानंतर तिची रिअॅक्शन काय असते? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.