मागच्या दोन दिवसांपासून टीव्ही अभिनेता शरद मल्होत्रा व त्याची पत्नी रिप्सी भाटिया यांच्यातील दुराव्याबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. दोघांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं, आता चार वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची माहिती समोर आली होती, पण आता शरदने या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे.
तब्बू आडनाव का लावत नाही? खुलासा करत म्हणालेली, “मला वडिलांच्या..”
शरदने एक निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या दाव्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच या बातमीचा कुटुंबाला त्रास होत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. “आमच्या नात्यातील दुराव्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी रिप्सी आणि मला गेल्या आठवड्यात प्रकाशनाने संपर्क साधला होता, पण मला त्यांचा प्रश्न प्रतिक्रिया देण्यायोग्य वाटला नव्हता,” असं शरद म्हणाला.
“माझ्या पीआर टीमने त्यांना अशी माहिती देणाऱ्या स्त्रोताबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. त्याच्या एका आठवड्यानंतर, निराधार काल्पनिक कथांसह एक बातमी छापली गेली. यामुळे आमच्या कुटुंबीयांचा मानसिक छळ झाला आहे. खोटे आरोप आणि अविश्वसनीय स्त्रोतांवर विश्वास ठेवल्याबद्दल संबंधित माहिती प्रकाशित करणाऱ्यांनी आमची माफी मागावी, तसेच त्यांनी त्या आम्हाला तथाकथित स्त्रोताचे नाव देखील आम्हाला सांगावे,” अशी मागणीही शरद मल्होत्राने केली आहे.
शरदच्या पत्नीने १२ एप्रिल रोजी पतीसोबत असे कोणतेही मतभेद नाकारले होते. या अफवांवर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, “कृष्णाच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच लग्नाची चार वर्षे आणि एकमेकांच्या प्रेमात पडण्याची पाच वर्षे पूर्ण करणार आहोत, आमच्यात कोणतेच मतभेत नाहीत.”