‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची जबरदस्त चर्चा आहे. पहिल्या सीझनपैकी भारतपे कंपनीचा फाउंडर अशनीर ग्रोव्हर या दुसऱ्या सीझनमध्ये नसल्याने बऱ्याच लोकांना हा सीझन आवडणार नाही अशी चर्चा होती. पण हा नवा सीझनही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे आणि देशातील वेगवेगळ्या उद्योजकांच्या भन्नाट बिझनेसमध्ये कार्यक्रमातील शार्क्सनी भरभरून गुंतवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या सीझनमध्येसुद्धा प्रत्येक शार्कची अजूनही तितकीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या शार्क्सपैकी ‘बोट’ कंपनीचे सीईओ अमन गुप्ता याची जबरदस्त चर्चा आहे. अमनची स्टाइल, त्याचे कपडे, हेअरस्टाइल, चश्मा, त्याचा बोलण्याचा अंदाज, हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. शिवाय अमनच्या प्रवासाबद्दलही प्रत्येकाला कौतुक वाटतं. अमनच्या उद्योगविश्वातील प्रवासाबरोबरच त्याच्या खासगी आयुष्याचीसुद्धा चर्चा असते.

आणखी वाचा : बेस्ट फ्रेंड सोनाली खरेबरोबर अमृता खानविलकरने अशी एन्जॉय केली सुट्टी; फोटो व्हायरल

नुकतंच अमनने युट्यूबवरील ‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये अमनने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल प्रथमच खुलासा केला आहे. अमन आणि त्याची पत्नी प्रिया डागर यांची लव्हस्टोरीदेखील फिल्मी होती. याबद्दल बोलताना अमन म्हणाला, “जेव्हा आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो तेव्हा मी थोडा चिप माणसासारखं वागायचो. मला एखादी गोष्ट पाहिजे असली की मी त्यामागे हात धुवून लगायचो. खरंतर प्रियाला मी एवढा आवडत नव्हतो, पण मला तीच माझी जोडीदार म्हणून हवी होती. एकेदिवशी अचानक तिने मला एक शेवटचा मेसेज केला आणि आता यापुढे हे नातं पुढे टिकणार नाही असं सांगितलं आणि ती दुसऱ्या दिवशी पुण्याला जाणार होती.”

पुढे अमन म्हणाला, “मी खुप उदास होतो, माझ्या बाबांना पण ही गोष्ट जाणवली. आमच्या नात्याचा असा शेवट मला पचत नव्हता, कारण मला यामागील काहीच कारण माहित नव्हतं. माझ्या बाबांनी मला तिच्याशी जाऊन बोलण्याचा सल्ला दिला. तेव्हा ज्यादिवशी तिची दिल्लीवरुन पुण्याला जाणारी ट्रेन होती त्या दिवशी मी पण त्याच ट्रेनमध्ये बिना तिकिटाचा चढलो, ती सेकंड टायर एसीमध्ये होती, मी तिच्या बोगीमध्ये गेलो आणि तिच्या बाजूने जाताना तिला ओळख दाखवली. तीसुद्धा चक्रावली, कारण मी इथपर्यंत पोहोचेन असं तिला वाटलं नव्हतं. त्यानंतर आम्ही भेटून बोललो, एकमेकांची बाजू समजून घेतली आणि तेव्हापासून आजपर्यंत तब्बल १५ वर्षं झाली आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही.” २००८ मध्ये अमनने प्रियाशी लग्न केलं, आज त्यांना २ मुलं आहेत. २०१६ मध्ये अमनने ‘बोट’ कंपनीची स्थापना केली आणि आज जगभरात या कंपनीचं नाव घेतलं जातं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shark tank india fame and ceo of boat aman gupta shares his love story on podcast avn
First published on: 05-03-2023 at 17:31 IST