टेलिव्हिजनवरील ‘शार्क टँक इंडिया’ या रीयालिटि शोला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली. नवीन बिझनेसच्या संकल्पनेत पैसे गुंतवण्याच्या या स्पर्धेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. परदेशात हा कार्यक्रम हीट ठरलाच, पण भारतातही या कार्यक्रमाची क्रेझ निर्माण झाली ती अशनीर ग्रोव्हर या परीक्षकामुळे. पहिल्या सीझनमधल्या शार्क्सपैकी अशनीरने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला.

त्याचं सडेतोड बोलणं, भूमिका घेणं, नावडत्या गोष्टीला थेट नकार देणं, त्याचा फटकळ स्वभाव यामुळे तो ‘शार्क टँक इंडिया’चा सर्वात जास्त चर्चेत असणारा शार्क बनला. ‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर दिसणार नसल्याचं समजल्यावर त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले. नुकतंच ‘रेड एफएम’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुद्द अशनीरने याविषयी वक्तव्य केलं आहे.कार्यक्रमाच्या निर्मात्यांना अशनीरला घेणं परवडत नसल्याने त्यांनी या दुसऱ्या सीझनमध्ये त्याला वगळल्याचं समोर आलं आहे. यावर अशनीरने हसत उत्तर दिलं की, “परवडण्यासाठी फक्त पैसेच नाही तर तुमची लायकीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते.”

आणखी वाचा : “मी घरोघरी जाऊन…” शाळेत नापास झाल्यावर मधुर भांडारकर यांनी केला ‘हा’ व्यवसाय; दिग्दर्शकाने सांगितली आठवण

याच मुलाखतीमध्ये अशनीरला बिग बॉस या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने नकारार्थी उत्तर देत या कार्यक्रमावरही टीका केली. अशनीर म्हणाला, “तुम्ही मला कधीच त्या कार्यक्रमात पाहणार नाही. जे जीवनात अपयशी ठरले आहेत तेच त्या कार्यक्रमात तुम्हाला दिसतील. एककाळ होता जेव्हा मी तो कार्यक्रम पाहायचो, पण आता तो कार्यक्रम अत्यंत शिळा झाला आहे. त्यांनी मला मध्यंतरी विचारलं होतं, पण मी त्यांना साफ नकार कळवला.”इतकंच नाही तर जर त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी मला सलमान खानच्या फीपेक्षा जास्त पैसे ऑफर केले तर मी यावर विचार करेन असंही अशनीर या मुलाखतीमध्ये म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Ashneer Grover (@ashneer.grover)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशनीर त्याच्या लग्झरी लाईफास्टाईलमुळे आणि वादग्रस्त कोर्टकेसमुळे चर्चेत होता. आता या नवीन सीझनमध्ये तो नसल्याने प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘शादी डॉट कॉम’ची को-फाऊंडर अनुपम मित्तल, ‘बोट’ कंपनीचे को-फाऊंडर अमन गुप्ता,‘लेंस्कार्ट’चे संस्थापक पीयुष बंसल असे जून शार्क्स या दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. अशनीर ऐवजी ‘कार देखो’ ग्रुपचे सीईओ अमित जैनच दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे.