scorecardresearch

शशांक केतकरने सांताक्लॉज होत स्वतःला दिली ‘ही’ लखमोलाची भेट, फोटो व्हायरल

शशांक केतकरने केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या ख्रिसमसनिमित्त त्याने एक खास गोष्ट केली आहे.

शशांक केतकरने सांताक्लॉज होत स्वतःला दिली ‘ही’ लखमोलाची भेट, फोटो व्हायरल

सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. काहीजण सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गावी गेलेली आहेत, तर काहीजण ख्रिसमस आणि न्यू इअर निमित्त कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर वेळ घालवत त्यांना भेटवस्तू देत आहेत. अशातच अभिनेता शशांक केतकरने केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या ख्रिसमसनिमित्त त्याने एक खास गोष्ट केली आहे.

शशांक केतकर म्हणजे मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. शशांकही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. आता त्याने स्वतःचाच सांताक्लॉज होऊन स्वतःला एक खास गिफ्ट दिलं आहे.

आणखी वाचा : “आता वेळ आलीए पूर्णविराम देण्याची…” सुव्रत जोशीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहते निराश

हेही वाचा :“नाटकाच्या प्रयोगाला ४० मिनिटं आधी…”; शशांक केतकरने विक्रम गोखलेंबरोबरच्या आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

काल तो स्वतःचाच सांताक्लॉज झाला आणि स्वतःला इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिली. या नवीन गाडीबरोबरचे त्याचे काही शेअर त्याने पोस्ट केले. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिलं, “तर … स्वतःचा सांताक्लॉज होऊन स्वतःलाच एक भेटवस्तू दिली आहे. हळूहळू मी १००% इव्ही मोडवर शिफ्ट होणार आहे पण सुरुवात एक दुचाकीपासून.” त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 09:47 IST

संबंधित बातम्या