‘बिग बॉस १३’ मधून नावारूपाला आलेली अभिनेत्री शहनाज गिल हिचे वडील संतोक सुख सिंह यांना जीवे भरण्याची धमकी मिळाली आहे. एका विदेशी नंबरवरून काही तरुणांनी फोन करून संतोक यांना ही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांना दिवाळीच्या आधी घरात घुसून मारू अशी धमकी फोनवरून मिळाली.

आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा माझा…”

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणांनी सुरुवातला त्यांना फोनवर शिवीगाळ केली आणि नंतर दिवाळीच्या आत घरात घुसून मारू अशी धमकी दिली. याबाबत संतोक यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. याआधीही संतोक यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता ज्यातून ते थोडक्यात बचावले होते. २०२१ साली संतोक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. २५ डिसेंबरला दोन तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

हेही वाचा : शहनाझ गिल पुन्हा प्रेमात? ‘या’ अभिनेत्याशी जोडलं जातंय नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोक अमृतसरहून परतत असताना त्यांच्या ड्रायव्हरने गाडी एका ढाब्याजवळ थांबवली होती. दोन सशस्त्र अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून तेथे येत संतोक यांच्यावर गोळ्या झाडल्या. संतोक यांच्या बॉडीगार्डने त्यांना वाचवलं होतं. यावेळी दोन्हीही हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. बॉडीगार्डमुळे संतोक यांचा जीव थोडक्यात बचावला होता.