अभिनेता महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने अलीकडेच तिची बहिण शिल्पा शिरोडकर बिग बॉसमधून घरी परतल्याबद्दल आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. शिल्पा शिरोडकर नुकत्याच संपलेल्या बिग बॉस १८ मध्ये सहभागी झाली होती.

नम्रताने आपल्या बहिणीबरोबरचे काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये नम्रताने लिहिले, “तुला पाहून खूप आनंद झाला!” नम्रता शिरोडकरच्या वाढदिवसाच्या निमित्त शिल्पाने तिच्या हैदराबाद येथील घरी जाऊन तिची भेट घेतली.  

शिल्पा शिरोडकर बिग बॉस १८ चे विजेतेपद जिंकू शकली नाही आणि शोमधून बाहेर पडली. ती त्या घरात पहिल्या दिवसापासून होती, पण १०२ व्या दिवशी तिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. 

एविक्शननंतर दिलेल्या मुलाखतीत शिल्पा ती शोदरम्यान तिच्या घरच्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहिली नाही असे वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेक ट्रोलचा सामना करावा लागला. 

एका मुलाखतीत शिल्पाला महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर पोस्ट करत पाठिंबा का नाही दिला याबद्दल विचारले होते. शिल्पाने यावर सांगितले होते , अशा गोष्टींवरून लोकांनी नातेसंबंधांचा निर्णय करू नये. ती पुढे म्हणाली होती, “माझ्या कुटुंबाचे आणि माझे नातेसंबंध कसे आहेत हे मला माहीत आहे. मी त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हेही मला माहीत आहे, आणि हेच सर्वांत महत्त्वाचं आहे.” 

नुकत्याच नम्रता शिरोडकरच्या वाढदिवसानिमित्त शिल्पाने भावनिक पोस्ट लिहिली होती. “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नम्रता शिरोडकर! गेल्या तीन महिन्यांत तुला आणि तुझ्याशी साधं बोलणंही खूप मिस केलं, मग ते फोनवर असो किंवा कॉफी पिताना. तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील! एक अप्रतिम बहीणच नव्हे, तर प्रेम, ताकद आणि आनंदाचा स्रोत असल्याबद्दल तुझे आभार! खूप खूप प्रेम!” 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही आठवड्यांपूर्वी शिल्पा शिरोडकरला बिग बॉसच्या घरात तिची मुलगी अनुष्का रंजीत भेटायला आली होती. तिला पाहताच शिल्पा भावुक होत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शिल्पा शिरोडकर १९९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. तिने ‘गोपी किशन’, ‘किशन कन्हैय्या’, ‘त्रिनेत्र’ या सिनेमात काम केले आहे.