दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी १३’चे शूटिंग सुरू आहे. या शोमध्ये बॉलीवूडसह छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. या शोमध्ये स्पर्धक स्टंट करताना अनेक स्पर्धेक जखमीही झाले आहेत. बिग बॉस १६ फेम शिव ठाकरेही स्टंट करताना जखमी झाला आहे.

हेही वाचा- Video : साईशा भोईरचा ‘नवा गडी नवा राज्य’ मालिकेला रामराम, ‘ही’ बालकलाकार झळकणार ‘चिंगी’च्या भूमिकेत, प्रोमो समोर

शिव ठाकरेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शिवाने ब्लॅक टॉप आणि व्हाइट जीन्ससह तपकिरी रंगाचे विंटर फर जॅकेट घातलेले दिसत आहे. ‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना शिवच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या हाताच्या बोटाला टाकेही पडले आहेत.

काही दिवसांपूर्वी मराठमोळा शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी १३’चा पहिला फायनलिस्ट बनल्याची माहिती समोर आली होती. टेली चक्कर’ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली होती. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत बातमी समोर आलेली नाही. शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’चा विजेता आहे तसच तो ‘बिग बॉस १६’ चा उपविजेताही आहे. ‘रोडीज’ व ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दिली होती. त्यानंतर आता ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वात त्याला पाहायला चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा- “तो खूप गुणी आहे पण…,” मुग्धा वैशंपायनने सांगितली प्रथमेश लघाटेमधील न आवडणारी गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’चे १३ वे पर्व दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे. या शोमध्ये शिव ठाकरेसह ऐश्वर्या शर्मा, डेझी शाह, अर्जित तनेजा, शिझान खानसह अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. हा शो १५ जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर रात्री ९ वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात.