छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम अशी ओळख असलेल्या बिग बॉसमुळे शिव ठाकरे घराघरात पोहोचला. शिव ठाकरे हे नाव आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि बिग बॉस हिंदी अशा अनेक कार्यक्रमामुळे तो प्रसिद्धीझोतात आला. मात्र शिव ठाकरे आतापर्यंत एकही चित्रपट किंवा मालिका केलेली नाही. नुकतंच त्याने याबद्दल भाष्य केले.

शिव ठाकरे हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बिग बॉसच्या घराबद्दल, मंडलीबद्दल आणि इतर विषयांवरही भाष्य केले. यावेळी शिवने लवकरच मी मोठ्या पडद्यावर दिसण्याचे माझे स्वप्न पूर्ण करेन, असे म्हटले.
आणखी वाचा : ‘…तरच मी काढेन’ वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्यावर शिव ठाकरे स्पष्टच बोलला

यावेळी शिवला मराठी बिग बॉसनंतर तू रुपेरी पडद्यावर दिसशील, अशी चाहत्यांची इच्छा होती. पण शिव ठाकरेचा एकही मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही, यामागचे कारण काय? असे विचारण्यात आले.

त्यावेळी शिव म्हणाला, “मला मराठी चित्रपटांसाठी अनेकदा विचारणा झाली. काही चित्रपटासाठी माझी निवडही झाली होती. तारखाही निश्चित झाल्या होत्या. तर काही कारणाने चित्रपटच रद्द झाले. हा सर्व नशिबाचा खेळ आहे. माझ्या बाबतीत अनेकदा तोंडाजवळ येऊन घास हिरावला जातो, असं होतं.पण मी खचणाऱ्यातला नाही. शिव ठाकरे कधीही खचणार नाही. कदाचित माझी अजून वेळ आलेली नाही. पण लवकरच मी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर दिसेन.

आणखी वाचा : शिव ठाकरे आणि वीणाचा ब्रेकअप नेमका कधी झाला? समोर आली खरी तारीख 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बिग बॉस मराठी संपल्यानंतर मला अनेक ऑफर आल्या होत्या. पण करोना आला, त्यानंतर त्यातील काही गोष्टी हातातून गेल्या, काही लोकांनी नकार दिला, तर काहींनी ते रद्द केले. पण जर ते झालं नसतं तर हिंदीत काही तरी करायची इच्छा अपूर्ण राहिली असती”, असे शिव ठाकरेने म्हटले.