scorecardresearch

शिव ठाकरे खरोखर ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार? खुलासा करत म्हणाला, “अजूनपर्यंत मी…”

रोहित शेट्टीने त्याला ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाची ऑफर दिली आणि तो ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये दिसेल अशाही चर्चा रंगल्या होत्या. आता स्वतः शिवने यावर भाष्य केलं आहे.

shiv rohit

शिव ठाकरे सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये सहभागी होऊन त्याने त्याची छाप सर्वांवर पाडली आहे. ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी त्याच्याकडे आली नसली तरीही त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. ‘बिग बॉस १६’ संपताच शिवकडे नवीन प्रोजेक्टच्या ऑफर्सची रांग लागली आहे. रोहित शेट्टीने त्याला ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाची ऑफर दिली आणि तो ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये दिसेल अशाही चर्चा रंगल्या होत्या. आता यात तो दिसणार की नाही हे स्वतः शिवने सांगितलं आहे.

काल शिवने इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याला दिलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले. याचबरोबर त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलचीही अधिक माहिती दिली. त्याला खरोखरच ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर आली का, हेही त्याने सांगितलं.

आणखी वाचा : “मी जिवंत आहे तोपर्यंत…” ‘बिग बॉस १६’ संपताच शिव ठाकरेने चाहत्यांना दिलं मोठं वचन

शिव म्हणाला, “‘बिग बॉस १६’ मध्ये सहभागी झाल्यापासून तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करत आला आहात. ते पाहून मी भारावून गेलो आहे. आता माझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल अनेक चर्चा रंगू लागले आहेत. त्यात मी ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार असंही बोललं जात आहे. मला या कार्यक्रमाची विचारणा झाली आहे. पण आतापर्यंत मी त्यांच्याबरोबर फक्त एक मीटिंग केली. त्याचबरोबर अजूनपर्यंत मी त्यांच्याबरोबर कुठलंही कॉन्ट्रॅक्ट साइन केलेलं नाही. येत्या काही दिवसांत आमच्यात पुढील बोलणी होतील.”

हेही वाचा : ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”

आता शिव ठाकरेचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. त्यामुळे तो ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसावा अशी इच्छा त्याचे चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. परंतु तो खरोखर या कार्यक्रमात सहभागी होणार की नाही हे पुढील काही दिवसांतच समोर येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 12:59 IST