‘स्टार प्रवाह’चे जुने व लोकप्रिय चेहरे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘देवयानी’ फेम अभिनेत्री शिवानी सुर्वे व ‘गोठ’ फेम अभिनेता समीर परांजपे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’ परिवात दमदार एन्ट्री करत आहेत. शिवानी व समीर पहिल्यांदाच या मालिकेतून एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या नव्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा आणखी एक नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर आज सकाळी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये शिवानी सुर्वे व समीर परांजपे यांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत शिवानीने मानसी सणसची भूमिका साकारली आहे. तर समीर तेजस प्रभूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – पाकिस्तानातील प्रेक्षक बॉलीवूडच्या प्रेमात! नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले जातायत करीना, शाहरुख व अजय देवगणचे चित्रपट

नव्या प्रोमोमध्ये मानसी (शिवानी) आपल्या आदर्श असणाऱ्या गायत्री प्रभूकडे (मानसी कुलकर्णी) प्रशस्तीपत्रावर सही घेण्यासाठी तिच्या घरी जाते. याच वेळी तिची भेट तेजसशी होते. मानसी तेजसला गायत्रीविषयी विचारते आणि प्रशस्तीपत्रावर सही पाहिजे असल्याचं सांगते. तेव्हा तेजस म्हणतो, “कठीण आहे” आणि घरात जायला सांगतो. मानसी घरात जाते. पण गायत्री तिला पाहून चिडते आणि तिचा सगळ्यांसमोर पुन्हा अपमान करते. मानसी तशीच माघारी फिरते तेव्हा तेजस तिला थांबवतो. मग तेजस स्वतः मानसीच्या प्रशस्तीपत्रावर गायत्रीची खोटी सही देतो. मानसीला प्रशस्तीपत्रावर गायत्रीची सही पाहून आनंद होतो.

हेही वाचा – ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरच्या बॉयफ्रेंडची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, तब्बल ६ वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने ‘या’ मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाली, “किती समजून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण आता गायत्रीला आदर्श मानणारी मानसी आणि गायत्रीच्या विरोधात असणारा तेजस एकत्र कसे येतात? यांचं नातं कसं तयार होतं? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, १७ जूनपासून ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिका सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ही नवी मालिका पाहता येणार आहे. पण यामुळे सध्या सुरू असलेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.