Shivani Surve Birthday : ‘देवयानी’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सुर्वेला घराघरांत एक नवीन ओळख मिळाली. तिची ही मालिका छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती. यानंतर अभिनेत्रीने ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होत तिथेही प्रसिद्धी मिळवली. छोट्या पडद्यावर यश मिळवल्यावर शिवानी मोठ्या पडद्यावर झळकली. आजवर अभिनेत्रीने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय हिंदी कलाविश्वात देखील काम केलं आहे. अशा या शिवानी सुर्वेचा आज ३० वा वाढदिवस आहे.

शिवानी सुर्वेने वैयक्तिक आयुष्यात अभिनेता अजिंक्य ननावरेशी लग्नगाठ बांधली. फेब्रुवारी महिन्यात यांच्या लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर या जोडप्याने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. शिवानी व अजिंक्यची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिका संपल्यावर त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. कालांतराने या दोघांमध्ये घट्ट मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

हेही वाचा :६ महिन्यांआधी आम्ही एका…”, पूजा सावंतला नवऱ्याने दिलं गोड Surprise; ऑस्ट्रेलियातून शेअर केले फोटो

अजिंक्य ननावरेची शिवानीसाठी पोस्ट

लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त आज अजिंक्यने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लव्ह ऑफ माय लाइफ! हा दिवस तुझ्यासाठी अविस्मरणीय ठरावा. चिअर्स टू माय ब्युटिफूल वाइफ…आपण आयुष्यभर असेच वाढदिवस साजरे करूयात.” अशी पोस्ट शेअर करत अजिंक्यने “बायको म्हणून पहिला वाढदिवस” आणि “लकी नवरा” असे हॅशटॅग्ज या पोस्टला दिले आहेत. अजिंक्यने शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिवानीने तिच्या जवळच्या मित्रमंडळींबरोबर हा वाढदिवस साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे.

अजिंक्यच्या या रोमँटिक पोस्टवर अभिनेत्रीने ( Shivani Surve ) खास कमेंट केली आहे. “अहो थँक्यू…” असं म्हणत तिने नवऱ्याचे आभार मानले आहेत. शिवानीच्या या कमेंटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेघा धाडे, ईशा केसकर यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : पहिल्या नजरेत प्रेम, हिरोने लपवली ओळख अन्…; २३ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ रोमँटिक चित्रपट! आजही प्रत्येक गाणं आहे सुपरहिट

Shivani Surve
शिवानी सुर्वेची कमेंट ( Shivani Surve )
View this post on Instagram

A post shared by ??????? ?????? ???????? (@ajinkya_nanaware)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री ( Shivani Surve ) सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर, अजिंक्य ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत झळकत आहे. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.