श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आरोपी आफताब पूनावालाने आपली लिव्ह-इन-पार्टनर असलेल्या श्रद्धा वालकर हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते जंगलामध्ये फेकून दिल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. दिल्लीमधील या हत्याकाडांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक कलाकार याप्रकरणी व्यक्त होताना दिसत आहे. नुकतंच मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रकरणावर उघडपणे भाष्य केले आहे. तिने याबद्दल जाहीरपणे तिचे मत मांडले आहे.

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत तिने देविका हे पात्र साकारलं होतं. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळच्या आणि लाडक्या मैत्रिणीचे हे पात्र होते. नुकतंच तिने श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रकरणी संतप्त पोस्ट शेअर केली आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या राजकीय पक्षांवरही टीका केली आहे.
आणखी वाचा : “मी तुमच्यासाठी घटिया औरत…” केतकी चितळेने नेटकऱ्याला सुनावले खडेबोल

राधिका देशपांडेची पोस्ट

“अंधश्रद्धा

आम्ही श्रद्धेनं देवाचं नेटानं करतो. आमची देवावर नितांत श्रद्धा आहे. आमचा कृष्ण त्यामुळे आमचे रक्षण करतो. त्यामुळे आमच्या घरी ‘ती’ श्रद्धा नाही. म्हणजे “मेरा अब्दुल वैसा नहीं है” सारखंच नाही का?

ज्या श्रद्धेचं वारंवार आपल्याला सध्या कानी पडतं आहे ती आमची नाही. ती दुसऱ्याची. मुळात आमच्याकडे श्रद्धाच नाही. आणि तेच खरं आहे. आपल्याकडे आहे ती अंधश्रद्धा. जे झालं, जे होतं आहे ते दुसऱ्याच्या घरी, शेजारी. आपल्या घरातले देव देव्हाऱ्यात सुखरूप राहावेत म्हणून आपण मनाची कवाडं बंद ठेवतो. घराचं दार बंद करून डोळे मिटून घेतो आणि अंधारात सूख मानून घेतो. त्या श्रद्धा कडे बोट दाखवत बाकीची बोटं मुठीत झाकून टाकतो. कारण आपल्याला अज्ञानात सुखी राहायची सवय झाली आहे. अंगाला लावून न घेण्याची सवय झाली आहे. तुम्हाला माझं हे लिहिणं झोंबणार कारण मी बोट ठेवते आहे आपल्या पांगुळपणावर. आपली “श्रद्धा संपली आहे” हे आपल्याला मान्यच करायचं नाही आहे. मुळात ती आपली कशी? आपलं रक्त आटत नाही, तळ पायाची आग मस्तकात जात नाही. आपण पेटून उठत नाही. नाही, नाही, नाहीच होत आपल्याला काही असं. कारण आपण फक्त बघायचं काम करतो. डोळे उघडून, जागरूक होऊन खरी परिस्थिती कधी समजून घेणार? त्यांचा “अजेंडा” आहे, त्यांची “टूल कीट” कधी आपल्या डोक्यात शिरणार? आपण खोटं खोटं आणि सतत खोटं बोलणाऱ्या नेत्यांचे कॉमेडी शोज बघत बसणार, विनाकारण जोडो जोडो म्हणणाऱ्यांचे गोड गोंडस फोटो बघत राहणार!

मुघलांनी ज्या ज्या देशांवर राज्य केलं तो तो देश बहुसंख्य मुस्लिम झाला. हिंदू आया बहिणींचे वाटोळे करण्याचे प्रयत्न आज ही सुरू आहेत. डोळ्यावरची पट्टी काढा. जरा इतिहासात झाकून बघा. मला आपल्या भारत मातेला प्रश्न विचारायचा आहे. का तू ‘सबुरी‘ ठेवली आहेस अजूनही? का श्रद्धा आहे तुझी तुझ्या लेकरांवर?

“भारत तेरे टुकड़े होंगे” म्हणणाऱ्यांनी त्या भारतीचे तुकडे तुकडे करून दाखवले, तरी आपण कातडी बचाऊ रिएक्शन देणार. आज मी लिहिले कारण मला तुम्हाला काहीतरी सुचवावेसे वाटले. पटले तर घ्या नाहीतर विचारांचे श्राद्ध घालून मोकळे होण्याचा मार्ग आहेच. श्रद्धा, ॐ शांति”, असे राधिका देशपांडेंने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राधिकाची ही पोस्ट कायमच चर्चेत असते. सध्या ती या मालिकेत दिसत नाही. त्यामुळे तिने ही मालिका सोडल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राधिकाने यापूर्वी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात काम केली आहे. ‘व्हेनिला स्ट्राबेरी अँड चॉकेलट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.