सध्या सर्वत्र झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्ड सोहळ्याची चर्चा सुरु आहे. आज दुपारी १२ वाजता झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डचा झगमगता आणि हास्याचे कारंजे फुलवणारा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे यंदा या कार्यक्रमाची सूत्र दोन कॉमेडी क्विन्सच्या हातात असणार आहे. विनोदी नाटक आणि चित्रपटात पडद्यावर व पडद्यामागे कलाकारांचा यात गौरव होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेल्या निर्मिती सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री श्रेया बुगडेही त्यांच्यासोबत झळकणार आहे. या दोघी झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्ड सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाची आतिशबाजी पाहायला मिळणार आहे.

नुकतंच अभिनेत्री श्रेया बुगडेने या कार्यक्रमाचे दोन प्रोमो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका प्रोमोत श्रेया ही तिच्या नवऱ्याच्या टीव्ही बघण्यावर बोलताना दिसत आहे. यात ती म्हणते, माझा नवरा नेहमी टीव्हीच बघत असतो. त्यावर निर्मिती सावंत म्हणतात, चांगलं आहे ना, बायकांना तर बघत नाही ना तो. त्यावर श्रेया म्हणते, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी साडी नेसलेल्या बायका बघत असतो. यावर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम हसताना दिसत आहे.
आणखी वाचा : तृतीयपंथी विशिष्ट पद्धतीने टाळी का वाजवतात? गौरी सावंत यांनी सांगितले खरे कारण

तर दुसऱ्या प्रोमोत श्रेया बुगडे ही झोंबिवली गाण्यातील एका गाण्याबद्दल बोलताना दिसत आहे. यापाठोपाठ निर्मिती सावंत या देखील एका गाण्याची नक्कल करताना दिसत आहे. त्यांचा हा प्रोमोही प्रचंड चर्चेत आहे. या दोन्ही प्रोमोला श्रेया बुगडेने फार छान कॅप्शन दिले आहे. माझ्या बकेट लिस्टपैकी एक असलेल्या या गोष्टीला मी टीकमार्क करत आहे. निर्मिती सावंत यांच्याबरोबर कार्यक्रमाचे होस्टिंग करण्यात फार मजा आली. हे नक्की बघा!!! ९ ऑक्टोबर दुपारी १२ आणि रात्री ७ वाजता झी टॉकीज कॉमेडी अॅवॉर्ड!!!, असे श्रेया बुगडे म्हणाली.

आणखी वाचा : ‘तू मावा खातोस का?’ विचारणाऱ्याला अभिनय बेर्डेचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला “मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान झी टॉकीजद्वारे विनोदी नाटक आणि चित्रपटात पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचा गौरव, थिरकायला लावणारे डान्स, हसून लोटपोट करणारे स्किट आणि भन्नाट किस्से यावेळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रथमच दोन स्त्रिया या अवॉर्ड सोहळ्याचं अँकरिंग करणार आहेत. येत्या रविवारी ९ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळा पाहता येणार आहे. झगमगता आणि हास्याचे कारंजे फुलवणारा सोहळा म्हणून याकडे पाहिले जाते.