अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्ष विविध मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या प्रार्थनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्रार्थनाही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने पोस्ट केलेले तिचे मोनोकिनीमधील फोटो खूप चर्चेत आले आहेत. या तिच्या फोटोंवर श्रेयस तळपदेने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे एकमेकांचे खास मित्र मैत्रीण आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठी’ त्यांची मालिका खूप गाजली. या मालिकेमध्ये श्रेयस आणि प्रार्थनाने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेतील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. या मालिकेमुळे त्यांच्यातलं ऑफस्क्रीन बॉण्डिंगही घट्ट झालं. आता प्रार्थनाचा या नवीन फोटोंवर श्रेयसने ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये कमेंट केली आहे.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

काल प्रार्थनाने तिचे पांढऱ्या व निळ्या रंगाच्या मोनोकिनीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलच्या जवळ बसलेली दिसत आहे. तिच्या या बोल्ड फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. तिचे चाहते तिचा हा लूक आवडल्याचं सांगत आहेत, तर काहींनी तिला ट्रोल केलं आहे. अभिनेता श्रेयस तळपदेला प्रार्थना बेहेरेचा हा लूक खूप आवडला. या फोटोंवर कमेंट करत त्याने लिहिलं, “फ्लॉवर समझे क्या.. फायर हैं मॅडम!”

हेही वाचा : “माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा भाग…,” श्रेयस तळपादेची पत्नी दीप्तीने मालिकेबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता त्याची ही कमेंट खूप चर्चेत आली आहे. या कमेंटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्याची ही पुष्पा स्टाईल आवडल्याचं सांगितलं आहे. तर श्रेयसबरोबरच मनोरंजन सृष्टीतील प्रार्थनाच्या अनेक मित्रमंडळींनी कमेंट करत तिचा हा बोल्ड अंदाज आवडल्याचं सांगित तिचं कौतुक केलं आहे.