सिनेसृष्टीत सध्या कलाकारांच्या साखरपुड्याच्या, लग्नाच्या बातम्या येत आहेत, दुसरीकडे घटस्फोटांच्या बातम्याही येत आहेत. राहुल महाजनच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. अशातच आणखी एका अभिनेत्रीने पतीपासून विभक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ फेम अभिनेत्री श्रुती रावत पती निखिल आगवणेपासून विभक्त होत आहे.

पाकिस्तानी सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार? निर्मात्याने ऑफर दिल्यावर म्हणाली, “मी विचार…”

श्रुतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. तिने लिहिलं, “खूप विचार केल्यानंतर, निखिल आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपापल्या आयुष्यातील वाटेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्यात जवळपास एक दशक मैत्री होती. मैत्री हा आमच्या नात्याचा गाभा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची मैत्री कायम असेल. आम्ही आमच्या शुभचिंतकांना विनंती करतो की त्यांनी या काळात आम्हाला सपोर्ट करावा आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्यावी.”

३१ जुलै २०२३ रोजी श्रुती रावतने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत माहिती दिली. ती तिचा पती निखिल आगवणेपासून वेगळी होत आहे. दोघेही मित्र होते आणि भविष्यातही मित्र राहतील, पण पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास संपतो आहे. दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्या हाल मिस्टर पांचाल’, ‘चिंटू चिंकी और एक बडी सी लव्ह स्टोरी’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या शोमध्ये श्रुती रावतने काम केलंय. लग्नापूर्वी श्रुती व निखिल रिलेशनशिपमध्ये होते, त्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये लग्न केलं होतं. २०१९ मध्ये श्रुती आई झाली होती. आता लग्नाच्या सात वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.