scorecardresearch

‘भाभीजी घर पर है’ मालिकेला व्हल्गर म्हणणाऱ्यांवर संतापली शुभांगी अत्रे, म्हणाली, “डॉक्टरांनीही आमचा शो…”

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमध्ये अंगुरी भाभी हे पात्र साकारते.

shubhangi atre
(फोटो – इन्स्टाग्राम)

मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमध्ये अंगुरी भाभी हे पात्र साकारते. तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडते. तसेचही ही मालिकाही खूप लोकप्रिय आहे. ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खूप हसवते. पण बऱ्याचदा यात व्हल्गर विनोद केले जातात, असा आरोपही होतो. या आरोपांबद्दल शुभांगी अत्रेने प्रतिक्रिया दिली आहे.

“माझ्या पतीला शोधा”, २२ दिवसांपासून बेपत्ता नवऱ्यासाठी अभिनेते शेखर सुमन यांच्या बहिणीचा आक्रोश

‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना शुभांगी म्हणाली, “माझ्या एका मित्राचे वडील अंथरुणाला खिळले आहेत, पण ते शो पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. बर्‍याच कॅन्सरग्रस्त रुग्णांनी आम्हाला सांगितले आहे की ते मूड सुधारण्यासाठी ही मालिका पाहतात. डॉक्टरांनीही आमचा शो रुग्णांना पाहण्यास सांगितलं आहे, कारण त्यामुळे तणाव कमी होतो. हसणे ही सर्वोत्तम थेरपी आहे आणि मला आनंद आहे की आम्ही ही सकारात्मकता पसरवत आहोत.”

दीपिका कक्करचं पहिलं लग्न का मोडलं होतं? घटस्फोटानंतर अभिनेत्रीने शोएब इब्राहिमशी धर्म बदलून केलेला विवाह

अनेक वेळा शोवर ‘अ‍ॅडल्ट ह्युमर’ वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर टीकाही होत असते, यावर शुभांगी म्हणाली, “मी माझ्या कुटुंबाबरोबर हा शो पाहते आणि हा शो मर्यादेबाहेर कोणतेही विनोद करत नाही, असं मला वाटतं. शोमध्ये फक्त हेल्दी फ्लर्टिंग आहे आणि त्याची परवानगी तर कॉमेडी शोला असायलाच हवी, नाही का?” असा प्रश्न तिने केला.

Video: MC Stan वर भर गर्दीत पुन्हा एकदा हल्ला; व्हायरल व्हिडीओ पाहून चाहत्यांचा संताप अनावर

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला शुभांगी तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. तिने पतीपासून घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. पती पियुष पुरे व शुभांगी यांचा घटस्फोट झाला आहे. “गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत नाही. पियुष आणि मी आमचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलं. सन्मान, विश्वास आणि मैत्रीवरच लग्नाचं नातं टिकून असतं. पण आमच्या मतभेदांमधून कोणताच मार्ग निघत नव्हता” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 08:10 IST

संबंधित बातम्या