प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं शुक्रवारी जीममध्ये व्यायम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ४६ व्या वर्षीच त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धांतच्या निधनाने संपूर्ण टीव्ही जगताला धक्का बसला आहे. सगळीकडे सिद्धांतच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धांतच्या संपूर्ण कुटुंबाला यामुळे धक्का बसला आहे. त्यानंतर त्याच्या निधनाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहेत. आताही त्याच्या निधनाबाबत नवी माहिती समोर आली असून त्यात सिद्धांतच्या जीम ट्रेनरने त्याला वर्कआऊट न करण्याचा सल्ला दिला होता असं बोललं जात आहे.

‘झी न्यूज’शी बोलताना सिद्धांत वीर सूर्यवंशी ज्या जिममध्ये वर्कआऊट करत असे त्या जिममधील एका व्यक्तीने सिद्धांतबद्दल माहिती दिली आहे. ११ नोव्हेंबरला दुपारी जेव्हा सिद्धांत जिममध्ये आला होता तेव्हा त्याने डोकं दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्याच्या ट्रेनरने त्याला व्यायाम न करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर बाकावर बसताच तो खाली पडला.

आणखी वाचा- “तो तणावात होता अन्…”; सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या मैत्रिणीने केला खुलासा

सिद्धांतला बेशुद्धावस्थेत पाहून जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ४५ मिनिटे त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण तोपर्यंत सिद्धांत हे जग सोडून गेला होता. त्या व्यक्तीने सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून सिद्धांत आपला अर्धा वेळ जिममध्ये घालवत असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धांत वीर सूर्यवंशीने ‘कसौटी जिंदगी की’,‘जिद्दी दिल माने ना’, ‘ममता’, ‘ज़मीन से आसमान तक’, ‘विरोध’, ‘भाग्यविधाता’, ‘क्या दिल में है’, ‘गृहस्थी’ . टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्याची जवळची मैत्रीण विश्वप्रीत कौर हिने सिद्धांतबद्दल सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. तिने सिद्धांतला डॉक्टरांची मदत घेण्याचा सल्लाही दिला होता पण त्याने काहीही ऐकलं नाही.”