किशोर कुमार बॉलिवूडमधील असे गायक ज्यांनी गेली कित्येक वर्ष भारतीयांच्या मानत घर केलं आहे. त्यांच्या आवाजाचे आजही अनेकजण चाहते आहेत. त्यांच्या करिअरमध्ये सर्व भाषांमधील जवळपास १५०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला होता त्यांनी १९४६ मध्ये ‘शिकारी’ चित्रपटातून डेब्यू केलं होतं. ते उत्तम गायक, अभिनेते होते मात्र त्यांनी कधीच कोणाकडून याचे प्रशिक्षण घेतले नाही.

कपिल शर्माच्या कार्यक्रमात त्यांचा मुलगा अमितकुमार आला होता. त्याने असे सांगितले की ‘माझ्या वडिलांकडे हे गुण अंगभूत होते. ते कधीच शास्त्रीय संगीत शिकले नाहीत. त्यांचे गुरु होते कुंदन सेहगल, त्यांना बघून बघून, त्यांची गाणी ते लहानपणापासून ते गात असतं. त्यांना ही दैवी देणगी होती’. या कार्यक्रमात अमित कुमारने आपल्या वडिलांबद्दलच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. तसेच आपल्या वडिलांची गाणीदेखील त्याने कार्यक्रमात गायली.

किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त कलाकारांचा गौरव, विवेक अग्निहोत्री यांना मिळणार पुरस्कार?

किशोर कुमार यांचं खरं नाव आभास गांगुली असं होतं. त्यांना संगीत दिग्दर्शक एस.डी. बर्मन यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक दिला होता. एका माध्यमाशी बोलताना किशोर कुमार यांनी सांगितलं होतं की त्यांचा भाऊ अशोक कुमार यांच्यामार्फत एस.डी. बर्मन यांना भेटले होते. अशोक कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘किशोर कुमार लहानपणी खूपच बेसुरे होते’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किशोर कुमार मूळचे खांडव्याचे असून ४ ऑगस्ट १९२९ मध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदी चित्रपटसृष्टी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, हिंदी, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, उडिया आणि उर्दूसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ते बॉलिवूडमध्ये विचित्र स्वभावासाठी ते ओळखले जात होते. त्यांचा मुलगा अमित कुमारनेदेखील अनेक चित्रपटात पार्श्वगायन केले आहे.