प्रथमेश लघाटे हा आजच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. आज त्याचा वाढदिवस. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’पासून प्रेक्षक त्याला बघत आले आहेत. त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं. तर गेले काही महिने तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. तर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची होणारी बायको मुग्धा वैशंपायन हिने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. पण त्याला प्रथमेशने दिलेलं उत्तर खूप चर्चेत आलं आहे.

प्रथमेश आणि मुग्धा यांनी काही महिन्यांपूर्वी ते एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा करत त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं. तर सध्या ही दोघं गोव्याला गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेली आहेत. तर आज प्रथमेशच्या वाढदिवशी मुग्धाने त्यांचा एक खास फोटो शेअर केला. त्याला प्रथमेशने दिलेल्या उत्तरातून तो मुग्धाला काय नावाने हाक मारतो हे समोर आलं आहे.

आणखी वाचा : ‘अशी’ सुरु झाली मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी, म्हणाले, “घरी सांगितलं तेव्हा…”

मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा आणि प्रथमेश चा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती प्रथमेशला मिठी मारून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “हॅपी हॅपी बर्थडे माय मॅन…” तर प्रथमेशनी मुग्धाची ही स्टोरी त्याच्या अकाउंटवरून रिपोस्ट केली आणि लिहिलं, “थँक यू मुगा…” तर आता प्रथमेशच्या या स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं असून तो मुग्धाला मुगा अशी हाक मारतो हे समोर आलं आहे.

हेही वाचा : “तिचा नवरा माझा…”, अखेर प्रथमेश लघाटेने दिली त्याच्या आणि स्पृहा जोशीच्या नात्यावर प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता प्रथमेश आणि मुग्धा लग्न कधी करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी ते या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी विवाहबद्ध होतील असं सांगितलं. त्यामुळे आता ते त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा कधी करत आहेत याची त्यांचे चाहते वाट बघत आहेत.