‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्या दोघांनीही संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी प्रथमेशने एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले.
नुकतंच मुग्धाची बहिण मृदुलाचा लग्नसोहळा अलिबागमध्ये पार पडला. मृदुल आणि विश्वजीतच्या विवाहसोहळ्यातील काही फोटो मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या बहिणीच्या रिसेप्शनच्या वेळी मुग्धा आणि प्रथमेशने खास फोटोशूटचे फोटो पोस्ट केले होते.
आणखी वाचा : ‘अॅनिमल’ चित्रपटासाठी तृप्ती डिमरीने घेतलं फक्त ‘इतकं’ मानधन
या फोटोत मुग्धा आणि प्रथमेश हे दोघेही हसताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. त्यावर प्रथमेशने सडेतोड उत्तर दिले आहे.
“का दात काढत असतात सारखे हे”, असे त्या नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले आहे. त्यावर प्रथमेशने “तुम्हालाच हसतोय”, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा : निळू फुलेंच्या लेकीची स्टार प्रवाहच्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री; पाहा व्हिडीओ
दरम्यान मुग्धा आणि प्रथमेशने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्यावर सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. त्या दोघांचीही पहिली भेट लिटिल चॅम्प्सच्या मंचावर झाली होची. या शोनंतर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम व्हायचे. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.