मराठी गायक सुदेश भोसले यांच्या कन्येचा साखरपुडा झाला आहे. श्रुती भोसले मराठी अभिनेत्याशी लग्न करणार आहे. मराठी अभिनेता प्रतिक देशमुख व श्रुती भोसले यांचा साखरपुडा कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. श्रुतीने काही खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
‘शुभ लग्न सावधान’ फेम प्रतिक देशमुख सुदेश भोसले यांचा जावई होणार आहे. सुदेश भोसले यांची लेक श्रुती व प्रतिक यांनी साखरपुडा उरकला आहे. प्रतिक व श्रुती यांनी सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं होतं. श्रुतीने साडी नेसली होती, तर प्रतिकने सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता.
फोटोंमध्ये श्रुती व प्रतिक एकमेकांना अंगठ्या घालताना दिसत आहेत. तसेच दोघांनी केकबरोबरचे, कुटुंबियांबरोबरचे फोटोही पोस्ट केले आहेत. कुटुंबातील सदस्यांबरोबर सेल्फी काढताना श्रुती व प्रतिक त्यांच्या एंगेजमेंट रिंग फ्लाँट करत आहेत.
पाहा श्रुती भोसलेची पोस्ट
श्रुती भोसलेने साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीही श्रुती व प्रतिकचं अभिनंदन करत आहेत. तेजश्री प्रधानने इन्स्टाग्राम स्टोरीवर श्रुती व प्रतिकच्या साखरपुड्याची पोस्ट केली. “प्रतिक मी तुझ्यासाठी खूप खुश आहे,” असं तेजश्री प्रधानने फोटोवर लिहिलं.

दरम्यान, प्रतिक देशमुख आहे लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. तसेच तो लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे. प्रतिकने ‘शुभ लग्न सावधान’, ‘जजमेंट’, ‘गोल गोल गरा गरा’, ‘अजूनी’ या कलाकृतींमध्ये काम केलंय. त्याचबरोबर त्याने अनेक जाहिरीतीही केल्या आहेत.