केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राजकारणात येण्याआधी अभिनेत्री होत्या. मालिकांमध्ये काम करुन त्यांनी लोकप्रियता मिळवली. छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. टेलिव्हिजनमधून सुरुवात करणाऱ्या स्मृती यांना संपूर्ण देश ‘तुलसी नावाने ओळखतो. स्मृती यांनी पत्रकार, आरजे, गीतकार नीलेश मिश्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीत खऱ्या आय़ुष्यात घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. हा किस्सा ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेदरम्यानचा आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत काम करत असताना मी गरोदर राहिली, पण मला याची जाणीव नव्हती. मी मालिकेसाठी सतत शूटिंग करत होतो आणि मला खूप थकवा जाणवत होता. मी सेटवरही सांगितले की मला बरे वाटत नाही. तरीही मला सतत काम करायला लावलं. शूट संपेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सेटवरच मला थकवा जाणवत होता. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांना घरी जाऊन आराम करण्याची परवानगी दिली.
स्मृती यांनी सांगितलं की, मी माझ्या डॉक्टरांशी फोनवल बोलल्यावर डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. रुग्णालयात जात असताना रस्त्यातच रक्त वाहू लागलं. त्यावेळी पाऊस पडत होता. मी एक रिक्षा थांबवली आणि त्याला रिक्षा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं. मी रुग्णालयात गेले तिथं एक नर्स माझ्याकडे धावत आली आणि त्याही परिस्थितीमध्ये तिनं माझ्याकडे सही मागितली. मी तशा अवस्थेतही तिला निराश केलं नाही. मी तिला सही दिली. त्यानंतर तिला सांगितलं की मी इथं अॅडमिट होण्यासाठी आले आहे. कारण मला असं वाटतं की माझं मिसकॅरेज झालं आहे.’
स्मृती म्हणाल्या की, मिसकॅरेज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आले जेव्हा त्यांनी एकता कपूरला हा प्रकार घडल्याचे सांगण्यासाठी फोन केला तेव्हा तिने लगेचच उद्या शूटला येण्यास सांगितले. या शोमध्ये इतर ५० पात्रे असली तरी ट्रॅक कुणासोबतही शूट केला जाऊ शकतो. पण शोमधील एका अभिनेत्याने एकताला सांगितले होते की स्मृती खोटे बोलत आहे.
स्मृती त्यावेळेस रवी चोप्रा यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीता मातेची भूमिका साकारत होत्या. जेव्हा त्यांनी जेव्हा रवीजींना सांगितले की हे माझ्यासोबत घडले आहे पण मी उद्या परत येईन, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि चिडले. म्हणाले, वेड्यासारखे बोलू नको, तू तुझे मूल गमावले आहे. मला माहित आहे ते किती वेदनादायक आहे, तू आराम करा. उद्या येण्याची गरज नाही, मी बघतो काय करायचं ते. स्मृती म्हणाल्या की त्यांना गरज असूनही त्यांनी तिला पाठिंबा दिला होता आणि सेटवर न येण्यास सांगितले होते.