‘आता होऊ दे धिंगाणा २’ हा स्टार प्रवाह वाहिनीवरील कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने सांभाळली. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या प्रत्येक भागांमध्ये दोन मालिकांमधील विविध कलाकार उपस्थिती लावतात. त्यानंतर विजयी होण्यासाठी या कलाकारांना विविध टास्क करावे लागतात. दर शनिवारी-रविवारी या कार्यक्रमाने आणि प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धार्थ जाधवने सर्वांचं भरभरून मनोरंजन केलं. आता लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या महाअंतिम सोहळ्यात सर्व मालिकांमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. यावेळी हे कलाकार एकत्रितपणे धमाल करणार असल्याचं नवीन प्रोमो पाहून लक्षात येत आहे. वाहिनीने ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या महाअंतिम सोहळ्याचा एक खास प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी पतीसह पोहोचली माधुरी दीक्षित, तर रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझी म्हणाले, “दादा…”

‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या महाअंतिम सोहळ्याच्या प्रोमोमध्ये स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या सर्व मुख्य पुरुष कलाकारांनी रंगमंचावर स्त्री वेशात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी अर्जुनने सायलीची, मल्हारने मोनिकाची, अक्षयने रमाची, तर अधिराजने नित्याची हुबेहूब नक्कल केली. आपल्या आवडत्या कलाकारांना स्त्री वेशात पाहून सर्वांनी एकच धमाल केल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : लग्नानंतर पूजा सावंत-सिद्धेश चव्हाण यांनी जोडीने केली सत्यनारायण पूजा! बहिणीने शेअर केला खास फोटो

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे. पण, आता लवकरच सिद्धार्थचा धिंगाणा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा २’ ची जागा ‘मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो घेणार आहे.