Star Pravah : छोट्या पडद्याचा प्रेक्षकवर्ग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर, काही मालिकांमध्ये नव्या अभिनेत्रींची एन्ट्री झालेली आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरची ‘अबोली’ ही मालिका गेली ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी व अभिनेता सचित पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच या मालिकेने १ हजार एपिसोड्स पूर्ण केले. यानिमित्ताने या सगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. याशिवाय दोन महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.

‘स्टार प्रवाह’च्या ‘अबोली’ मालिकेत नुकतीच दोन अभिनेत्रींची एन्ट्री झाली आहे. मालिकेत इन्सपेक्टर दिपशिखाच्या भूमिकेत दिसणार आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि शिवांगी देशमानेची भूमिका अभिनेत्री मयुरी वाघ साकारणार आहे. जान्हवी किल्लेकर साकारत असलेल्या दिपशिखा या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे. तर, मयुरी वाघ साकारत असलेली शिवांगी बीड मधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली आहे. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करतेय.

हेही वाचा : सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”

‘अबोली’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट

‘अबोली’ मालिकेने हजार भाग पूर्ण केल्यावर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाली, “अबोली मालिकेने तुमच्या प्रेमामुळे या १ हजार भागांचा एवढा मोठा पल्ला गाठला आहे. याशिवाय दोन नव्या मैत्रिणी या मालिकेत सहभागी झाल्या आहेत. पहिली जान्हवी किल्लेकर आणि दुसरी मुयरी वाघ. त्यांचं खूप खूप स्वागत आहे…याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे यापुढे, प्रतीक्षा मॅम यांची भूमिका मालिकेत रसिका धामणकर मॅम साकारणार आहेत.”

यावरून ‘अबोली’ मालिकेतून प्रतीक्षा लोणकर यांनी एक्झिट घेतली असून त्यांच्याऐवजी मालिकेत आता रमाची भूमिका अभिनेत्री रसिका धामणकर साकारणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. रसिका यांनी यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

A post shared by Celebrity katta (@celebrity_katta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता येत्या काळात ‘अबोली’ मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.