star pravah famous phulala sugandha maticha serial rebroadcasting from 5th December spg 93 | 'फुलाला...' मालिकेचा सुगंध सदैव दरवळत राहणार; लोकाग्रहास्तव वाहिनीचा मोठा निर्णय | Loksatta

‘फुलाला…’ मालिकेचा सुगंध सदैव दरवळत राहणार; लोकाग्रहास्तव वाहिनीचा मोठा निर्णय

ही मालिका बंद होतच असल्याने साहजिकच प्रेक्षक नाराज होते

‘फुलाला…’ मालिकेचा सुगंध सदैव दरवळत राहणार; लोकाग्रहास्तव वाहिनीचा मोठा निर्णय
(Photo: PR)

टीव्ही जगतात काही मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या असतात. त्या कधीही बंद होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. चित्रपटांप्रमाणे मालिकांचादेखील एक मोठा चाहता वर्ग आहे. अशीच एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ असं या मालिकेचे नाव असून या मलिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. किर्ती आणि शुभमच्या हटके लव्हस्टोरीमुळे या मालिकेचे चाहते आवर्जून ही मालिका बघत होते. ही मालिका बंद होतच असल्याने साहजिकच प्रेक्षक नाराज होते. मात्र प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ही मालिका जरी जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतला आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पहाता येईल.स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘ही मालिका स्टार प्रवाहच्या यशस्वी मालिकांपैकी एक आहे. सुंदर कथा, पटकथा, अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे ही मालिका रसिकांच्या मनात कायम घर करुन राहिली. प्रत्येक कथेला एक छान शेवट असतो. या मालिकेची गोष्ट आणि पात्रांचा प्रवास सुंदररित्या संपतोय. मालिका संपू नये ही रसिक प्रेक्षकांची मागणी हेच सिद्ध करतेय की ही मालिका जिंकलीय.

प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी ५ डिसेबरपासून संध्याकाळी ६ वाजता या मालिकेचं पुन:प्रसारण सुरु होत आहे. प्रेक्षकांना पहिल्या भागापासून ही मालिका पुन्हा पाहायला मिळेल. जर एखादा भाग तुमचा पाहायचा राहून गेला असेल, किंवा पुन्हा त्या आठवणीतल्या भागांचा आनंद लुटायचा असेल तर ६ वाजता स्टार प्रवाहवर नक्की पाहा फुलाला सुगंध मातीचा.’ मालिकेच्या पुन:प्रसारणवरून मालिकेतील कलाकरांनादेखील आनंद झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 19:24 IST
Next Story
Video : “तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही…” पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण