नवनवीन मालिका येण्याच सत्र कायम आहे. सातत्याने वाहिन्यांकडून नव्या मालिकांची घोषणा होतं आहे. त्यामुळे आता तीन आणि पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मालिका बंद होतं आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका म्हणजे अरुंधती ही महिलांसाठी आयडॉल झाली. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळे तिला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं. तसंच मालिकेतील इतर पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत. म्हणून मालिका बंद होणार असल्याचं कळताचं चाहते नाराज झाले आहेत. चाहते आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर आणखी एक लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने स्वतःसाठी नाही तर ‘या’ व्यक्तीसाठी खरेदी केली आलिशान गाडी, म्हणाली, “ती गाडी माझी नसून…”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरसाठी ‘हे’ सीन होते आव्हानात्मक, म्हणाली, “अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरून…”

सुत्रांच्या माहितीनुसार, साडे तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. ही मालिका ‘मुरांबा’, ‘अबोली’ नसून ‘लग्नाची बेडी’ आहे. अभिनेत्री सायली देवधर आणि संकेत पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका ३१ जानेवारी २०२२पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सुरुवातीला ‘लग्नाची बेडी’ मालिका रात्री प्रसारित होतं होती. पण त्यानंतर प्रसारणाची वेळ दुपारीची करण्यात आली. तरीही मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलंच खिळवून ठेवलं.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनामुळे ‘या’ चार सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार, नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये नेमकं काय झालं? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘लग्नाची बेडी’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण ‘लग्नाची बेडी’ या मालिकेची जागा कोणती नवी मालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.