Muramba Serial Promo : ‘मुरांबा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी ७ वर्षांचा लिप घेतला होता, ज्यानंतर मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं. परंतु, लीपनंतरही रमा-अक्षयमध्ये दुरावा कायम असून त्यांची लेक मात्र आई-वडिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

‘मुरांबा’ मालिकेत इरावती रमा व अक्षय यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करून अक्षयला रमापासून दूर करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं आणि आता ती अक्षयचा मालविकाबरोबर साखरपुडा करण्याचं ठरवते. मालविकाही अक्षयला मिळवण्यासाठी त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दिवाळीत रमा अभ्यंगस्नानाची तयारी करत असताना मालविका ते सगळं एकते आणि अक्षयला सांगत सर्व श्रेय स्वत: घेते; परंतु शेवटी रमाच अक्षय व आरोहीला उटणं लावते आणि मालविकाला दिलेलं चॅलेंजही पूर्ण करते.

मालविका असतानाही रमाने अक्षयला उटणं लावलं म्हणून इरावती, ती लक्ष्मी पूजनही करणार त्याआधीच अक्षयला जुने प्रसंग सांगत भडकावण्याचा प्रयत्न करते असं मालिकेत पाहायला मिळालं. अशातच आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये मालविका व अक्षय यांचा साखरपुडा होणार असल्याचं पाहायला मिळतं.

रमा असताना अक्षय – मालविकाचा साखरपुडा होईल का?

समोर आलेल्या प्रोमोमध्ये रमा अंगठीचा बॉक्स बघून “ही अंगठी कोणाची आहे” असं म्हणते, तेव्हा आरोही तिला “बाबांनी तुझ्यासाठीच आणलेली असणार घालून दाखव ना” असं म्हणते आणि जबरदस्तनीने तिच्या बोटात ती अंगठी घालते. त्यानंतर पुढे प्रोमोमध्ये इरावती आज अक्षय आणि मालविकाचा साखरपुडा आहे असं म्हणते आणि अक्षयला अंगठी घाल असं सांगते. पण, अक्षयने तो बॉक्स उघडल्यानंतर त्यात अंगठी नसल्याने तो अंगठी असं म्हणतो, त्यावर आरोही “ती तर आईच्या बोटात आहे” असं म्हणते.

प्रोमोमध्ये पुढे इरावती रमाकडे जाऊन, “यावर माविकाचा अधिकार आहे, काढ ती अंगठी” असं म्हणते. त्यानंतर रमा घाईघाईत ती अंगठी काढून देते; तेव्हा तिथे सीमा येते आणि “शेवटी जे ज्याच्या नशिबात असतं ते त्याच्याकडे जातंच” असं म्हणते. सीमाचं हे वाक्य ऐकून रमा व अक्षय एकमेकांकडे बघतात.

त्यामुळे आता खरंच अक्षय व मालविकाचा साखरपुडा होईल का की मालिकेत कुठलं वळण येणार हे येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल. मालविका व अक्षयच्या साखरपुड्याचा भाग प्रेक्षकांना ३ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळेल.