Premachi Goshta: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ४ सप्टेंबर २०२३पासून सुरू झाली होती. तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, इरा परवडे अशी मोठी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं पात्र घराघरात पोहोचलं. मुक्ता, सागर, सावनी, माधवी गोखले, इंद्रा कोळी, सई, जयंत कोळी असे सर्वजण प्रेक्षकांचे लाडके झाले. माधवी, इंद्राचे सतत होणारे वाद, मुक्ता-सागरमधील गैरसमज अन् मग प्रेम हे सगळं पाहायला प्रेक्षकांना खूप आवडू लागलं. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन या सगळ्यांची सांगड उत्तमरित्या झाली की मालिका सुपरहिट होतेच.

सुरुवातीलाच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला चांगला टीआरपी मिळाला. टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ अव्वल स्थानावर होती. एका आठवड्यात नंबरवन असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला मागे टाकून पहिलं स्थान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने मिळवलं होतं. पण, त्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर असे. गेल्या काही महिन्यांपासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा बदल झालेला पाहायला मिळाला.

जानेवारी महिन्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून तेजश्री प्रधानची एक्झिट झाली. त्यानंतर मालिकेच्या टीआरपीमध्ये मोठी घसरण झाली. तसंच मालिकेची वेळही बदलण्यात आली. असं असलं तरी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका तग धरून आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने आता ५०० भागांचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. याचा व्हिडीओ समोर आला आहे. तसंच ‘स्टार प्रवाह’नेही यानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

५०० भागांचा टप्पा गाठल्यानिमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. यासाठी खास लाल फुग्यांचं, फुलांचं डेकोरेशन करण्यात आलं होतं. मुक्ता, सागर, सावनी, सई, मिहिर, कोमल असे सर्वजण या सेलिब्रेशनमध्ये पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Sumeet Mhashelkar (@sumeet.mhashelkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या सावनीकडे सईची कस्टडी आहे. त्यामुळे सावनी सईला मॉडेल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सावनीसाठी सईचं शिक्षण नव्हे तर मॉडेलिंग महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे सईला सावनीच्या जाळ्यात अडकू न देण्यासाठी मुक्ता केअरटेकर म्हणून सावनीच्या घरी काम करत आहे. यासाठी मुक्ताने म्हाताऱ्या बाईचं रुप घेतलं आहे. लवकरच सईला म्हाताऱ्या बाईच्या रुपात मुक्ता आई असल्याचं समजणार आहे.