Marathi Actor Engagement : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं. तर, अक्षय केळकरसारख्या काही कलाकारांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच टेलिव्हिजन विश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे.

विविध मालिका, नाटकांमध्ये काम करणारा लोकप्रिय अभिनेता ऋग्वेद फडकेचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव विभा पवार असं आहे. गेली अनेक वर्षे हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. आता साखरपुडा पार पडल्यावर ऋग्वेद-विभाच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे.

ऋग्वेदच्या होणाऱ्या बायकोने गेल्यावर्षी इन्स्टाग्रामवर त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. “१७ सप्टेंबर २०२० पासून आपण एकत्र पाहिलेली कित्येक स्वप्नं आणि या चार वर्षात ती पूर्ण होण्याचा प्रवास… Rather एकत्र हट्टाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रवास…अशी अजून खूप स्वप्नं एकत्र पाहायची आहेत.” असं सुंदर कॅप्शन लिहित विभाने भावना व्यक्त केल्या होत्या. यावरून हे दोघंही अनेक वर्षांपासून एकत्र असल्याचं स्पष्ट होतं.

ऋग्वेद फडकेच्या साखरपुड्याला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते. अभिनेत्री अक्षता आपटे, स्वानंद केतकर, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम लीला म्हणजेच वल्लरी विराज या कलाकारांनी ऋग्वेदच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Rugved Phadke Engagement
Marathi Actor Engagement Rugved Phadke Engagement ( ऋग्वेद फडकेचा साखरपुडा )
Rugved Phadke Engagement
( ऋग्वेद फडकेचा साखरपुडा )

दरम्यान, ऋग्वेद फडके सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव विनोद असं आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी तो ‘पारू’ मालिकेत सुद्धा झळकला होता. ऋग्वेदने दिग्दर्शित केलेल्या ‘मुशाफिरी’ या नाटकाला सुद्धा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात अभिनेता पु. ल. देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारत आहे.